कारवाईसाठी जिल्हाधिकारी पाठक यांनी तीन दिवसापूर्वीच कामाला लावली होती यंत्रणा
आष्टी | वार्ताहर
आष्टी तालुक्यातील महामार्गावरील टाकळी अमिया फाटा येथे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांसह आष्टी पोलिसांनी आज रविवारी पहाटे छापा मारला.या ठिकाणी असलेल्या एका गोदामात पथकाला भेसळीचे दुधासाठी लागणाऱ्या पावडरच्या एक दोन नव्हे तर जवळपास 1000 गोण्या आढळून आल्या. महत्त्वाचे हे की, या कारवाईसाठी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी तीन दिवसापूर्वीच एफडीएची यंत्रणा कामाला लावली होती.शनिवारी रात्रीपासून स्वतः जिल्हाधिकारी पाठक यांच्यासह एफडीए व आष्टी पोलिसांचे पथक कारवाईसाठी तळ ठोकून होते. दरम्यान या कारवाईने टाकळी अमिया गाव चर्चेत आले आहे.
गोपनिय माहितीच्या आधारे आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया येथे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. जिल्हा यंत्रणेतील अधिकाऱ्यांनाही या गोपनीय कारवाईची माहिती देण्यात आली नव्हती. जिल्हाधिकारी सुट्टीवर असल्याचे सांगण्यात आले. तसेच सोबत घेण्यात आलेल्या एफडीएच्या पथकाला आणि आष्टी पोलिसांनाही कारवाईसाठी नेमके कोठे जायचे आहे? हे अखेरपर्यंत कळू देण्यात आले नव्हते.तितकी गोपनीयता या कारवाईदरम्यान राखण्यात आली होती.
टाकळी अमिया येथील अंबादास पांडुरंग चौधरी यांच्या साईदत्त एंटरप्राययजेस नावाने दुकान व लगत पत्र्याच्या शेडमध्ये गोदामात अन्न व पोलीस प्रशासनाने रविवारी पहाटे या ठिकाणी छापा मारला. या ठिकाणी भेसळयुक्त दुधाची निर्मिती करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पावडरच्या जवळपास 1000 गोण्या आढळून आल्या. अन्न सुरक्षा अधिकारी संदिप देवरे,अनुराधा भोसले,सहाय्यक आयुक्त कांबळे,आष्टीचे पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे आदींनी ही कारवाई केली.
Leave a comment