संत मुक्ताईंच्या पादुकांना चंद्रभागा स्नान

 

पंढरपूर । वार्ताहर

आषाढीवारीसाठी श्री क्षेत्र मुक्ताईनगर ते पंढरपूर अशी पायी वारी करत प्रस्थान ठेवलेला संत मुक्ताबाई पालखी सोहळा भुवैकूंठ असलेल्या पंढरीत रविवारी (दि.14) दुपारी 3 वाजता वारकरी मेळ्यासह दाखल झाला. याप्रसंगी संत मुक्ताईच्या पादुकांना चंद्रभागा स्नान घालण्यात आले.


यावेळी वरूणराजाने हजेरी लावली. वारकरी भाविकांनीही पहिले चंद्रभागा स्नान केले. यावेळी चंद्रभागा आरती करण्यात आली. मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र  पाटील,पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे, सम्राट पाटील,ज्ञानेश्वर हरणे, वारकरी भाविक उपस्थित होते.

 


पालखी सोहळा दत्त घाटावरील मुक्ताई मठात दाखल

चंद्रभागा स्नान झाल्यानंतर पालखी सोहळा जुने दगडी पुलावरून भुवैकूठ पंढरपूर येथे मिरवणूकीने दत्त घाटावरील मुक्ताई मठात दाखल झाला,तेथे आईसाहेब मुक्ताईंच्या पालखीची आरती करण्यात आली व अशाप्रकारे आईसाहेब मुक्ताईंचा पालखी सोहळा दत्त घाटावरील मुक्ताई मठात श्रीक्षेत्र पंढरपूरात विसावला.

मंगळवारी भावंडाच्या भेटी    

आषाढी पौर्णिममेपर्यंत पालखी सोहळ्याचा मुक्काम मुक्ताई मठ श्रीक्षेत्र पंढरपूर येथे असतो. येत्या 16 जुलैला वाखरी येथे संत निवृत्तीनाथ,संत ज्ञानदेव,संत सोपान,संत मुक्ताई,संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकाराम सकळ संतांचा पालखी भेट सोहळा होईल.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.