शिरूरकासार । वार्ताहर
तालुक्यातील भडकेल येथील एका किराणा दुकानाचे व घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानाच्या काऊंटरमध्ये ठेवलेली 2 लाख 70 हजार रुपयाची रक्कम चोरून नेली. चोरीची ही घटना 5 जुलै रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास घडली
याबाबत विनोद पांडुरंग आहेर यांनी फिर्याद नोंदवली. ते ऊसतोड मुकादम म्हणून काम करतात. त्यांचे भडकेल येथे किराणा दुकान आहे . 5 जुलै रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या बंद दुकानाचे व शेजारीच असलेल्या घराच्या दाराचे व खिडकीचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला, नंतर दुकानाच्या काउंटरमध्ये ठेवलेली 2 लाख 70 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर विनोद आहेर यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली त्यावरून अज्ञातांविरुद्ध नव्या कायद्यानुसार चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक निरीक्षक सपकाळ या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Leave a comment