पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची माहिती
बीड | वार्ताहर
बीड जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई यांच्या रिक्त पदांसाठी लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा येत्या दि. ७ जुलै २०२४ रोजी सकाळी ७ वाजता बीड शहरातील तेलगाव नाका येथील आदित्य कॉलेजमध्ये येथे घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी येणाऱ्या उमेदवारांना पावसाचे दिवस असल्यामुळे महिला व पुरुष उमेदवारांची दिवसाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे.
याबाबत त्यांनी म्हटले आहे की,बीड जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई यांच्या रिक्त पदांसाठी लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवार यांची लेखी परीक्षा येत्या दि. ७ जुलै २०२४ रोजी सकाळी ७ वाजता बीड शहरातील तेलगाव नाका येथील आदित्य कॉलेजमध्ये होणार आहे.
या परीक्षेसाठी बीड जिल्ह्याबाहेरुन मोठ्या प्रमाणात उमेदवार येणार आहे. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे लेखी परीक्षेसाठी येणाऱ्या उमेदवारांची गैरसोय होवू नये यासाठी महिला उमेदवारांची दि.६ जुलै २०२४ रोजी राहण्याची व्यवस्था पोलीस बॅरेक, पोलीस मुख्यालय, नगर रोड, बीड येथे करण्यात आली आहे.तर लेखी परीक्षेसाठी येणाऱ्या पुरुष उमेदवारांची राहण्याची व्यवस्था गॅलक्सी लॉन्स, व ताज लॉन्स, बार्शी नाका बीड येथे करण्यात आली आहे. सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे.
Leave a comment