परळी । वार्ताहर
गेल्यावर्षी प्रमाणे याहीवर्षी परळीत संत नामदेव महाराज यांच्या पालखीचा नेत्रदिपक रिंगण सोहळा उद्या दि.5 जुलै रोजी 4 वाजता संपन्न होणार आहे.परळील भाविक भक्तानी रिंगण सोहळा पाहण्याकरिता मोठ्या संख्यने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. परळीत रिंगण सोहळा व्हावा अशी अनेक वर्षापासून परळीकरांची इच्छा होती. वारकरी मंडळाच्या प्रयत्न केला म्हणून परळीत रिंगण सोहळा श्रीसंत नामदेव महाराज पालखीचा रिंगण सोहळा होत आहे.
माऊलींचा वारी सोहळा परळीत ही रिंगण सोहळा होत आहे यावेळी भाविकांनी सहकुटूंब उपस्थित राहून पालखीचे दर्शन घ्यावे. हा रिंगण सोहळा नेञदिपक ठरणार आहे. यावेळी पालखीसमोर फुगड्या व पाऊल्या खेळल्या जाणार आहेत. एकाच आवाजात व मृदंगाच्या नादाने परळी दुमदुमनार आहे. यावेळी राहुन ज्ञानोबा-तुकाराम असा जयघोष होईल. घोडे तुळशी वाले, हंडेवाले व विणा मृदंग वेगवेगळे रिंगण सोहळा भाविकांना अनुभवता येणार आहेत.
या रिंगण सोहळ्यास श्री वैद्यनाथ सेवाभावी भजनी मंडळ श्री शंभु महादेव महिला भजनी मंडळ, श्री संत भगवान बाबा महिला भजनी मंडळ, श्री हरिहर महिला भजनी मंडळ, श्री शंभु महादेव सेवाभावी महिला भजनी मंडळ, संत गजानन महाराज महिला भजनी मंडळ, संतश्रेष्ठ गुरुलिंग स्वामी महिला भजनी मंडळ श्री मुक्ताई महिला भजनी मंडळ, श्री भक्ती महिला भजनी मंडळ श्री मन्मथ स्वामी महिला भजनी मंडळ, श्री शिवकन्या महिला भजनी मंडळ, भक्ती स्वर साधना महिला भजनी मंडळ, श्री स्वामी समर्थ महिला भजनी मंडळ, श्री महारुद्र महिला भजनी मंडळ, श्री सोमेश्वर महिला भजनी मंडळ, श्री कल्याणकारी हनुमान महिला भजनी मंडळ,श्री सुर्वेश्वर महिला भजनी मंडळ, श्री जिव्हेश्वर महिला भजनी मंडळ, श्री वडसावित्री महिला भजनी मंडळ, श्री राधाकृष्ण महिला भजनी मंडळ, श्री शनैश्वर महिला मंडळ, श्री संकटमोचन हनुमान महिला भजनी मंडळ, संत जनाई महिला भजनी मंडळ, श्री संत तुकाराम महाराज महिला भजनी मंडळ, श्री विठाई महिला भजनी मंडळ, श्री इच्छापूर्ती महिला भजनी मंडळ,श्री कालिंका महिला भजनी मंडळ या सर्व महिला भजनी मंडळातील अध्यक्षा उपाध्यक्षा सहीत सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती वारकरी मंडळाचे अध्यक्ष रामेश्वर महाराज कोकाटे यांच्यासह जिल्हाध्यक्ष सौ.राधिकाताई जायभाय,सौ.सुरेखाताई मेनकुदळे,धर्माधिकारी ताई, सौ.चेतनाताई गौरशेटे सौ.शोभाताई चाटे,सौ.स्वातीताई चाटे,सौ रमाताई आलदे यांनी दिली आहे.
Leave a comment