मुंबई । वार्ताहर

2024-25 च्या अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चासत्रात बुधवारी (दि.3) रोजी आ.संदीप क्षीरसागर यांनी बीड मतदारसंघातील प्रमुख परंतु प्रलंबित असलेल्या मागण्या सभागृहात मांडल्या.

बीड शहरातील पाणीपुरवठ्याचा मुलभूत प्रश्न मुलभूत आहे. केवळ नगरपरिषदेकडे महावितरणची 36 कोटी थकबाकी असल्याने नवीन पाणीपुरवठा योजनेस वीज कनेक्शन मिळत नाही आणि परिणामी पाणीसाठा मुबलक असूनही बीड शहराला 15-20 दिवसाला पाणी मिळत आहे. याबाबत आ.संदीप क्षीरसागर यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने आदेश दिले असून या आदेशात, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांनी जिल्हाधिकारी व महावितरणचे अधिकारी तसेच संबंधित अधिकारी यांची बैठक घेऊन हा गंभीर प्रश्न असून यावर, ताबडतोब वीजबिल भरण्या संदर्भात उपाययोजना कराव्यात. असे म्हटले आहे. याबाबत नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव यांना आदेशित करून, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, जिल्हाधिकारी व महावितरणचे अधिकारी यांची बैठक घेण्यात यावी व राज्य सरकारने वीजबीलाचा काही भाग भरण्याचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी बुधवारी वारी (दि.3) रोजी पावसाळी अधिवेशनातील सन 2024-25 च्या अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चासत्रात केली. यासोबतच बीड मतदारसंघातील प्रमुख प्रलंबित असलेले विषय आ.क्षीरसागर यांनी सभागृहात मांडले.

बिंदुसरा नदीवर निम्न पातळी बंधारा बांधावा

या बंधार्‍यासाठी सदरील कामांचे सर्वेक्षण होऊन रितसर प्रस्ताव संकल्पन प्रस्ताव यथोचित मान्य करण्यात आलेला आहे.तसेच बिंदुसरा नदीवरील निम्न पातळी बंधारा या योजनेसाठी 95 टके विश्वासार्हतेने 3.23 दलघमी येवा उपलब्ध असल्याचे प्रमाणपत्र आहे. तसेच या प्रकल्पास आवश्यक (0.35 दलघमी पाणी वापरामुळे कोणताही परिणाम दिसून येत नाही. तरी, मध्य गोदावरी खोरे लवादानुसार पाणी वापर सुत्रानुसार प्रत्यक्ष पाणी वापर परगणित केल्यानुसार उपलब्ध होणार्‍या मंजुर 2.80 अब्ज घनफुट शिल्लक पाण्यामधून या बंधार्‍या करिता विशेष बाब म्हणुन सिंचनासाठी 0.35 दलघमी पाणी वापर प्रस्तावित केलेला आहे. या सर्व बाबींचा विचार करून या योजनेस प्रशासकीय मान्यता व निधी मंजूर करण्यात यावा. जेणेकरून बीड शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपुष्टात येईल. व हा पुल कम बंधारा असल्याने या भागातील लोकांची दळणवळणाची सोय होईल अशी मागणी आ.संदीप क्षीरसागरांनी केली.

टुकूर(खांडेपारगाव) साठवण तलाव प्रकल्प

टुकूर (खांडेपारगाव) साठवण तलाव प्रकल्पाची प्रशासकीय मान्यता व कार्यारंभ आदेश सन 2003 मध्ये दिले आहेत. त्यावेळेस त्या प्रकल्पाची किंमत भुसंपादनासह 15 कोटी रूपये होती.आज ती किंमत 350 कोटी रूपयांच्या दरम्यान आहे. टुकूर प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी होत असलेल्या विरोधामुळे ऑगस्ट 2021 मध्ये साठवण तलावाच्या ऐवजी कोल्हापुरी बंधारे धेणे बाबत सुचित केले होते. एकूण नऊ बंधारे या प्रकल्पाऐवजी होत आहेत. बंधार्‍याचा पाणीसाठा 1.74 दलघमी होत आहे. सिंचन क्षेत्र 390 हेक्टर होणार आहे व त्यासाठी 220 कोटी रूपये लागत आहेत. सदरील बंधारे नाळवंडी, खांडेपारगाव, अंथरवणपिंप्री, उमरी, उमरद, नागापुर,बहाणपुर, भाटसांगवी असे एकूण 9 ठिकाणी प्रस्तावित आहेत. या कामासाठी निधी मंजूर करण्यात यावा.

शहरी भागातील घरपट्टी, नळपट्टीवरील व्याज माफ करा

10 नोव्हेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार बीड जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. दुष्काळी परिस्थिती असल्याने ग्रामीण भागात जमीन महसूलात सूट देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याचप्रमाणे शहरी भागातील पाणीपट्टी व घरपट्टीवरील थकबाकीवर लावले जाणारे व्याज माफ करण्यात यावे.

बीड शहरातील रस्ते

बीड शहरामधील प्रमुख असलेले 25 ते 30 रस्ते रहदारी योग्य नसल्याने सदरील रस्ते करण्यासाठी शासनस्तरावरून नगरोत्थान किंवा इतर योजनेमधुन निधी व मंजुरी देण्यात यावी. अशी मागणी आ.क्षीरसागर यांनी केली. दरम्यान याविषयी मा.मुख्यमंत्री, मा.मुख्य सचिव, मा.प्रधान सचिव नगर विकास विभाग, प्रशासक व मुख्याधिकारी,नगर परिषद बीड यांच्याकडे वेळोवेळी पत्र व्यवहार केला असल्याचेही आ.क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.