परळी येथील बँक कॉलनीतील खळबळजनक घटना
परळी । वार्ताहर
तालुक्यातील मरळवाडी येथील सरपंचाचा परळी शहरात गोळ्या घालून खून करण्यात आला. खळबळ उडवून देणारी ही घटना परळी शहरातील बँक कॉलनीत शनिवारी (दि.29) रात्री नऊ ते साडेनऊच्या सुमारास घडली. या घटनेत अन्य एक गंभीर जखमी झाला आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली.
बापूराव आंधळे असे मयत व्यक्तीचे नाव आहे.ते तालुक्यातील मरळवाडी ग्रामपंचायतीचे सरंपच होत, तर गोटू गित्ते नामक व्यक्ती जखमी झाला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया परळी पोलीसात सुरु होती. मरळवाडीच्या सरपंचाचा गोळ्या घालून का खून करण्यात आला या मागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून परळी पोलिस पुढील तपास करित आहेत.
Leave a comment