बीड । वार्ताहर
बीडचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहिलेले अविनाश पाठक यांनी आज शुक्रवारी (दि.२८) दुपारी १२.३० वाजता मावळत्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी नूतन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांचा जिल्हा महसूल प्रशासनातील सर्व उपजिल्हाधिकारी तसेच महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने व स्नेहीजनांकडून स्वागत सत्कार करत त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
अविनाश पाठक हे यापूर्वी बीड जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. तसेच यापूर्वी अविनाश पाठक यांनी बीड जिल्हा महसूल प्रशासनात काम पाहिलेले आहे. त्यामुळे त्यांना बीड महसूल प्रशासनाचा मोठा अनुभव असून जिल्हाधिकारी म्हणून कामकाज पाहताना त्यांच्या शिस्तप्रिय प्रशासनातून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
राज्याचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांच्या सहीने दीपा-मुधोळ मुंडे यांची बदली करण्यात आली. बुधवारी याबाबतचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत. त्यात अविनाश पाठक यांची नियुक्ती, जिल्हाधिकारी, बीड या पदावर श्रीम. दिपा मुधोळ-मुंडे, भाप्रसे यांच्या जागी ते पद वरिष्ठ समय श्रेणीत अवनत करून केली आहे.
Leave a comment