बीड | वार्ताहर
बीड पोलीस भरतीदरम्यान दि.२३ जून २०२४ रोजी दुपारी १२ वा. व सायंकाळी ४ वा. पाऊस आल्यामुळे सदर दिवशी मैदानी चाचणी अपूर्ण राहिलेल्या उमेदवारांना उद्या दि. २९ जून रोजी पर्यंत मैदानी चाचणीसाठी हजर राहण्याच्या सूचना जिल्हा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिल्या आहेत. उमेदवारांना हे समक्ष व ओळखपत्रावर लेखी स्वरुपात कळविण्यांत आले आहे. दरम्यान पावसामुळे 1जुलै रोजी मैदानी चाचणीला बोलावलेल्या उमेदवारांनाही उद्या 29 रोजी मैदानी चाचणीसाठी येता येणार आहे.
याबाबत बीड जिल्हा पोलीस दलाने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, बीड जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर पोलीस भरती २०२२-२०२३ बाबतची शारीरिक चाचणी व मैदानी चाचणी प्रक्रिया दि. १९ जून २०२४ रोजी पासून कवायत मैदान, पोलीस मुख्यालय बीड येथे सुरु आहे. या मैदानी चाचणी दरम्यान दि.२३ जून रोजी दुपारी १२ वा. व सायंकाळी ४ वा. पाऊस आल्यामुळे सदर दिवशी मैदानी चाचणी अपूर्ण राहिलेल्या उमेदवारांना उद्या दि. २९ जून रोजीपर्यंत मैदानी चाचणीसाठी हजर राहण्यासाठी समक्ष व ओळखपत्रावर लेखी स्वरुपात कळविण्यात आले आहे.२३ जून २०२४ रोजी मैदानी चाचणी अपूर्ण असलेले उमेदवार हे मैदानी चाचणीसाठी हजर आलेले नाही अशा उमेदवारांनी दि. २९ जून रोजी मैदानी चाचणीसाठी हजर रहावे.
दि २४ जून रोजी कवायत मैदानावर मोठया प्रमाणात चिखल झाल्यामळे तसेच मैदानावर पाणी साचलेले असल्यामुळे सदर दिवशीची मैदानी चाचणी दि. १ जुलै २०२४ रोजी निश्चीत करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना १ जुलै रोजी मैदानी चाचणीसाठी हजर राहता येणार नाही किंवा या दिवशी ज्या उमेदवारांची इतर घटकात मैदानी चाचणी आहे असे उमेदवार २९ जून रोजी मैदानी चाचणीसाठी हजर राहू शकतात. त्या उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी प्रवेश देण्यांत येईल. तसेच ज्या उमेदवारांची इतर घटकात वेगळया पदासाठी शारीरिक चाचणी होती त्यामुळे उमेदवार या घटकात मैदानी चाचणीसाठी हजर राहू शकले नाहीत अशा उमेदवारांनी सुध्दा २९ जून व १ जुलै रोजी मैदानी चाचणीसाठी हजर राहू शकतात. १ जुलै२०२४ नंतर मैदानी चाचणीसाठी हजर येणाऱ्या उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी प्रवेश दिला जाणार नाहीअसेही या प्रसिद्धी पत्रकात पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी नमूद केले आहे.
Leave a comment