बीड । वार्ताहर
बीड श्री. संत ज्ञानेश्वर महाराज व संतश्रेष्ठ जगद्गुरु संत पालखी सोहळ्यात आळंदी ते पंढरपुर सुरुवात होत असुन या आषाढी वारी पालखी सोहळ्यात तुकाराम यांच्या जिल्ह्यातील विठ्ठलभक्त वारक-यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अ.भा. वारकरी मंडळाचे जिल्हा अध्यक्ष ह.भ.प. हरिदास जोगदंड यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात केले आहे.
जगद्गुरु संत श्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दिनांक 28 जून 2024 रोजी व श्री. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे दिनांक 29 जून 2024 रोजी प्रस्थान होणार आहे. प्रति वर्षी या पालखी सोहळ्यात लाखो वारकरी भक्त मोठ्या संख्येने उपस्थिती असतात. टाळमृदुंगाची साथ, मुखी विठ्ठलाचे नामस्मरण करीत रोज मैल दोन मैल पयी चालणार्या वारकर्यांसाठी सर्व स्तरातुन मदतीचा ओघ असतोच विशेष म्हणजे या वारीसाठी दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर लोकांची उपस्थिती दिसून येऊ लागली आहे.
विठ्ठल भक्तीची ओढ आणि विठ्ठल रुखमाईच्या दर्शनासाठी नाचत गात जो तो वारकरी हरिनामाच्या गजरात धुंद होताना दिसतो. मराठवाड्यातुन व बीड जिल्ह्यातून श्री. संत ज्ञानेश्वर महाराज व श्री. संत तुकाराम महाराज यांच्या पालखीमध्ये हजारो वारकरी समाविष्ठ झालेले असतात. बीड जिल्हयातुन गेल्या चार वर्षापासुन मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग या दिंडीमध्ये सहभागी होताना दिसुन येऊ लागला आहे. अखंड महाराष्ट्राचे दैवत आणि जात, पात धर्म पंथापासून दुर ठेवणारे वारक-यांच्या कुळात अनेक जण सहभागी होत आहेत. यातुनच वारकरी वैष्णवधर्म हा सामाजिक एकता निर्माण करण्यासाठी किती महत्वाचा आहे हे दिसुन येते. त्यासाठीच बीड जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी वेगवेगळ्या दिंड्यामध्ये सहभागी होत मानवधर्माची पताका अटके पार फडकाविण्यासाठी या सोहळ्यात सहभागी व्हावे, तसेच प्रत्येक वारकर्यांनी आपआपल्या आंगणात एक झाड लावून वारीत सहभागी व्हावे व त्या झाडाचे संगोपण करावे असे आवाहन अ. भा. वारकरी मंडळाचे जिल्हा अध्यक्ष ह.भ.प. हरिदास जोगदंड यांनी केले आहे.
Leave a comment