किल्लेधारुर | वार्ताहर
किल्लेधारुर येथील तेलगाव रोडवरील स्टेट बँक आॕफ इंडिया बँकेचे एटीएम मशिनच पहाटे चोरट्यांनी पिकमध्ये टाकून चोरून नेले. आज शनिवारी पहाटे ही घटना घडली. दरम्यान बँक कर्मचारी व पोलीसांच्या ही बाब लक्षात येताच पाठलाग करून त्यांनी माजलगाव तालुक्यातील जायकोवाडी येथे पिकअप पकडले.
पोलिसांनी पाठलाग केल्याने पिकअप व एटीएम मशीन ताब्यात घेतले आहे. चोराचा लवकरच तपास लागेल अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे.
Leave a comment