आष्टी तालुक्यातील पिंपरी घाटा येथील घटना
आष्टी । वार्ताहर
बीड-नगर राज्य महामार्गावरील पिंपरी घाटा येथील एका अॅटोमोबाईल व टायर्स दुकानाला मंगळवारी (दि.18) रात्री पावणेबाराच्या दरम्यान भीषण आग लागली. या आगीत जवळपास दहा लाख रुपयाचा माल जळून खाक झाला आहे .दुकानाच्या जवळ रिकामी पेट्रोलची बाटली सापडल्याने हा घातपाताचा प्रकार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, तीनच महिन्यांपूर्वी सुरू झालेले हे दुकान आगीत भस्मसात होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
आष्टी तालुक्यातील पिंपरी घाटा येथे बीड नगर राज्य महामार्गावर बंडू भागवत यांनी अवघ्या तीन महिन्यांपूर्वी शिवशंकर अॅटोमोबाईल व टायर्स दुकान सुरू केले. मंगळवारी संध्याकाळी दुकान बंद करून ते घरी गेले. रात्री बाराच्या दरम्यान दुकानातून अचानक आगीचे लोळ बाहेर पडत असल्याचे निदर्शनास आले. आत टायर आणि ऑइल असल्याने संपूर्ण दुकान भस्मसात झाले.
यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे चारचाकी, दुचाकीचे नवीन टायर, ट्यूब, हवा भरण्याचे चार मशिन, ऑईल डबेयासह विविध साहित्य होते. अंदाजे आठ ते दहा लाखांचे नुकसान झाले आहे. ही आग कशाने लागली कि, कोणी लावली हे अद्याप समजले नसले तरी कोणीतरी खोडसाळपणा करून आग लावल्याचा संशय व्यक्तकेला जात आहे.
Leave a comment