चोरट्यांनी दुचाकीवरून ठोकली धूम
अंबाजोगाई | वार्ताहर
बँकेतून दोन लाखांची रक्कम काढून दुचाकीवरून घराकडे निघालेल्या डॉक्टरची हँडलला अडकवलेली पैशाची बॅग हिसकावून चोरट्यांनी धुम स्टाईल पोबारा केल्याची घटना मंगळवार, दिनांक १८ जुन रोजी सकाळी अंबाजोगाई शहरात घडली.
याबाबत कळालेली अधिक माहिती अशी की, शरद बाळासाहेब जगताप (रा.जैन गल्ली,अंबाजोगाई) हे पशू चिकित्सक आहेत. गावकडे शेड बांधणे आणि लेबरचे पेमेंट करण्यासाठी त्यांनी मंगळवारी सकाळी अंबाजोगाई पीपल्स बँकेतून २ लाख ५ हजार रूपये काढले. ही रक्कम त्यांनी एका कापडी पिशवीत ठेवली आणि दुचाकीचा हँडलला अडकवून ते शेतगड्यासह घराकडे निघाले. ते सन्मती पतसंस्थेच्या समोर आले असता दुचाकीवरून पाठलाग करणाऱ्या दोन चोरट्यांनी गाडी वळवून समोरून येत त्यांच्या दुचाकीला धक्का दिला आणि हँडलला अडकवलेली पैशाची बॅग घेऊन ते कुत्तर विहीर रोडने पसार झाले. या प्रकरणी शरद जगताप यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. अशा घटनांत वाढ झाल्याने अंबाजोगाईकर त्रस्त झाले आहे.
Leave a comment