उत्तरप्रदेशातील ट्रकचालकांसह दोघांनी केले होते अपहरण
मलकापूर फाट्यावर नेकनूर पोलिसांनी आरोपींना घेतले ताब्यात

 

बीड-नेकनूर । वार्ताहर

 

धुळे-सोलापूर महामार्गावरीील मांजरसुंबाजवळील मोरगाव फाट्याहून रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या एका 14 वर्षीय मुला ट्रकमध्ये उचलून पळवून नेणार्‍या आरोपींना येरमाळा पोलिसांच्या मदतीने मलकापूर फाट्यावर ताब्यात घेण्यात नेकनूर पोलिसांना यश आले. पोलिसांनी तपास कार्याला वेग दिल्याने दोन तासात आरोपी जेरबंद झाले.पोलीसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतूक होत आहे.

 

अर्जुनकुमार अशोककुमार (ट्रकचालक, रा.कानपूर, उत्तरप्रदेश) व सुरेश गोपीचंद रा.आग्रा,उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. त्यांची ट्रक क्र.(आर जे.11-जीसी 4326) पोलीसांनी नेकनूर ठाण्यात आणून उभी केली आहे.

 

धुळे- सोलापूर हायवेवर मोरगाव फाट्यावर मामा सोबत शेतात गेलेल्या अभिषेक दत्ता खामकर (वय 14,रा. उदंडवडगाव,ता.बीड) हा रविवारी (दि.16) दुपारी साडेचार वाजता रस्त्याच्या बाजूला पडीक शेतात शेळ्या चारत असल्याने रस्त्याच्या कडेला थांबला होता. यावेळी धाराशिवकडे चाललेल्या एका ट्रक चालकाने गाडी अभिषेकजवळ थांबवत त्याला साथीदाराच्या मदतीने उचलून ट्रकच्या कॅबिनमध्ये घालून त्यास पळवून नेले.

 

याबाबतची माहिती परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने नेकनूर पोलिसांना दिली. सहायक निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून वाशी आणि येरमाळा पोलिसांना ट्रकची माहिती दिली. तक्रारदारांना सोबत घेत चौसाळा पोलीस चौकीच्या पोलिसांनी पारगाव टोल नाक्यावरील सीसीटीव्ही तपासणी करत मलकापूर फाट्यावर ट्रक ताब्यात घेत मुलाची सुखरूप सुटका केली.

 

या प्रकरणी सतीश नवनाथ चव्हाण यांच्या फिर्यादीवरून नेकनूर ठाण्यात भांदविचे कलम 363,323,504 ,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेकनूर ठाण्याचे सहायक निरीक्षक चंद्रकांत गोसावी, उपनिरीक्षक नितीन गट्टूवार,येरमाळा ठाण्याचे उपनिरीक्षक विलास जाधव, पोलीस कॉ.खटाणे, मुरूमकर,घुले, पुंडे,बळवंत, बांगर यांनी ही कामगिरी यशस्वी केली.उपनिरीक्षक अजय पानपाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.