क्षीरसागर काय बोलणार, भूमिकेकडे समर्थकांसह कार्यकर्त्यांचे लक्ष

बीड । वार्ताहर

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि.16 जून रोजी बीड शहरात कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यकर्ता मेळाव्यास गजानन कारखान्याचे माजी चेअरमन रवींद्र क्षीरसागर आणि बीड न.प.चे माजी उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे राजकारणापासून अलिप्त आहेत. या पार्श्वभूमीवर आजच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते नेमकी कोणती भूमिका मांडणार, याकडे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

 

बीड शहरातील आशीर्वाद मंगल कार्यालयात आज सकाळी 11 वाजता हा कार्यकर्ता मेळावा संपन्न होणार आहे. मागील दोन वर्षांपासून जयदत्त क्षीरसागर हे कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित राहिलेले नाहीत अशा स्थितीत आता ते कार्यकर्ता मेळाव्यातून नेमकी काय भूमिका मांडणार याची उत्सुकता क्षीरसागर समर्थकांसह त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.या मेळाव्याला जगदीश काळे, माधवराव मोराळे, जब्बारखान पठाण, विलास बडगे, गंगाधर घुमरे, तानाजी कदम, दिनकर कदम, प्रेमचंद लोढा, नितीन लोढा,अरुण डाके, वशिष्ठ नवले, चंद्रसेन नवले, रोहित क्षीरसागर, हेमंत क्षीरसागर, शरद ढाकणे, गणपत डोईफोडे, अजिंक्य चांदणे, सुधाकर मिसाळ, मुखीद लाला, अ‍ॅड.खाजा, नरसिंग नाईकवाडे, विष्णू वाघमारे, विलास विधाते, शिवाजीराव जाधव, किशोर पिंगळे, राणा चव्हाण, दिलीप आहेर, सिद्धेश्वर आर्सुळ, भगवान गवते, उषाताई सरवदे सुभाष क्षीरसागर, सुभाष बनसोडे, सखाराम मस्के, सुधाकर जाधव, धनंजय जगताप, अरुण बोंगाणे, विष्णू जाधव, सुलेमान पठाण, आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.

मेळाव्यातून क्षीरसागर कोणती भूमिका मांडणार?

यापूर्वी बीड विधानसभा मतदारसंघात प्रतिनिधित्व करताना जयदत्त क्षीरसागर यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात विविध खात्यांचे काम पाहिलेले आहे; परंतु मागील अनेक महिन्यांपासून ते राजकीय विजनवासात आहेत.आता लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जयदत्त क्षीरसागर यांनी नेमके टाइमिंग सादर कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यातून क्षीरसागर कोणती भूमिका मांडणार, कार्यकर्त्यांशी काय हितगूज करणार, आगामी विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने ते काय भूमिका मांडणार, हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.


 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.