बीड । वार्ताहर
बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक येत्या सोमवार दि.17 जून रोजी दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली ही जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये सन 2023-24 अंतर्गत मार्च 2024 अखेरच्या खर्चास मान्यता घेणे तसेच 7 जानेवारी 2024 रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त कायम करण्याबरोबरच जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 चा आढावा घेतला जाणार आहे. तसेच या बैठकीत ऐनवेळी प्रस्तावित कामांंबाबतही चर्चा केली जाणार आहे. याबाबत जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य सचिव जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी सर्व संबंधित यंत्रणेला पत्र दिले आहे. दरम्यान नव्या आर्थिक वर्षातील ही पहिली डीपीसीची बैठक असल्याने सर्वांचे लक्ष आहे.
Leave a comment