बीड । वार्ताहर
जि.प.शिक्षण विभागातील सावळा गोंधळ समोर आला आहे. 11 वी प्रवेश प्रक्रिया संदर्भात जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने दि.10 जून 2024 रोजी प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकाचे आदेश काढले आहेत. महत्वाचे हे की, दि.10 जून रोजी पत्र काढून दि.8 जूनपासून अकरावी प्रवेशासाठी नोंदणी करण्याचे पत्रात म्हटले आहे.
माध्यमिक शिक्षण विभागाने दि.10 जून रोजी 11 वी प्रवेश प्रक्रिया राबवण्यासंदर्भात पत्र काढले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी दि.8 ते 16 जून, तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे दि.18 जून, विद्यार्थ्यांचे आक्षेप नोंदवणे दि.18 ते 19 जून आणि अंतिम गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे दि.20 जून यासह प्रत्यक्ष प्रवेशाच्या अनुषंगाने वेळापत्रक जाहिर केले आहे. मुळात दि.8 जूनपासून नोंदणी प्रक्रिया सुरू करायची होती. तर शिक्षण विभागाने त्यापूर्वीच पत्र काढणे आवश्यक होते. मात्र दोन दिवस उशिराने पत्र जारी करुन गत दोन दिवस आधीपासून नोंदणी सुरू करा असे म्हणने कितपत योग्य आहे असा प्रश्न पालकांमून विचारला जात आहे.
Leave a comment