24 तासात झाला 28.5 मिलीमटर पाऊस; संततधार कायम शेतकर्यांकडून कापूस लागवडीला सुरुवात
बीड । वार्ताहर
गतवर्षी दुष्काळाला सामोरे गेलेल्या बीड जिल्ह्यात यंदा वरुणराजाची कृपादृष्टी झाली आहे. 1 जून पासून जिल्ह्यात दररोज कुठे न कुठे पावसाची हजेरी लागत आहे. मागील चोवीस तासात 11 जून रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत जिल्ह्यात एकूण 28.5 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. यात अंबाजोगाई महसूल मंडळात 71.5 मि.मी., घाटंनादूर - 66 मि.मी. परळी तालुक्यातील धर्मापूरी महसूल मंडळात 81 मि.मी. व धारुर तालुक्यातील मोहखेड मंडळात 91.3 मि.मी. पावसाची म्हणजेच अतिवृष्टीची नोंद झाली असल्याची माहिती महसूल यंत्रणेने दिली आहे. या पावसादरम्यान सखल भागात तसेच काही ठिकाणी शेतात पाणी मोठ्या प्रमाणात जमा झाले होते. पावसाची संततधार कायम असल्याने जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी शेतकर्यांनी कपाशी लागवडीला सुरुवात केली आहे.
दुष्काळाचा सामना करणार्या बीड जिल्ह्यात यंदा अगदी 1 जूनपासून पावसाने चांगली सुरुवात केली आहे. मान्सूनचे आगमन वेळेतच होणार असल्याचे संकेत मिळाल्याने शेतकरी आता खरीप पिकांची पेरणी करण्याच्या तयारीला लागला आहे. जिल्ह्यात 1 जून ते 8 जून या कालावाधीत वार्षिक सरासरीच्या तुलनेत 43.9 टक्के पाऊस झाला आहे.. आगामी काही दिवस पावसाचा जोर वाढल्यान यंदा शेतकरी वेळेत पेरीणीची कामे उरकून घेतील अशी स्थिती आहे.गतवर्षी बीड जिल्ह्यात पावसाअभागी दुष्काळीस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे खरीप हंगामात महागडे व नामांकित कंपन्यांचे बियाणे, आणि खते वापरुनही पिकांची वाढ झाली नव्हती. त्याचा मोठा फटका बीड जिल्ह्यातील शेतकर्यांना बसला होता.
या पार्श्वभूमीवर आता जिल्ह्यात यंदा सुरुवातीलाच पावसाने चांगले आगमन केल्याने शेतकर्यांत आनंदाचे वातावरण आहे. मृग नक्षत्रात पेरणी करण्यावर शेतकर्यांचा भर असतो. त्यामुळे आणखी दोन-तीन मोठे पाऊस झाल्यास शेतकरी कापूस लागवडीसह सोयाबीन, मका, तूर पेरणीसाठी गती घेणार आहेत. शेतकर्यांनी खरीप हंगामासाठी शेतीची पूर्व मशागत करुन ठेवलेली आहे. यंदा जिल्ह्यात 8 लाखाहून अधिक हेक्टर क्षेत्रावर खरिप पीकांची लागवड होणार आहे. दरम्यान शेतकर्यांनी खरिपातील पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आपल्या शेतात किमान 80 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय आणि चांगला ओलावा आल्याशिवाय पेरणी करु नये असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. जिल्ह्यातील
Leave a comment