बीड । वार्ताहर
25 मे 2004 नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांना त्यांच्या मूळ सेवा जेष्ठतेनुसार पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली आहे. 10 जून रोजी याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे.
या पदोन्नतीसाठी 21 मार्च 2023 रोजी झालेल्या विभागीय पदोन्नती समितीच्या बैठकीत पात्र ठरलेल्या सहाय्यक निरीक्षकांपैकी सत्र क्र. 102 व त्यावरील 168 सहाय्यक निरीक्षकांना पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये बीड जिल्हा पोलीस दलातील सपोनि. सुरेखा संजय धस यांची तसेच मुस्तफा शेख यांना लातूर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात पदोन्नतीने पदस्थापना मिळाली आहे याबरोबरच सहाय्यक निरीक्षक दिगंबर पाटील यांना पदोन्नतीने मुंबई शहर येथे पोलीस निरीक्षक पदी पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली आहे.
Leave a comment