बीड | वार्ताहर 

बीड लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी आठ वाजेपासून शहरालगतच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात सुरुवात झाली सकाळी आठ ते नऊ या वेळेत मतमोजणीची पहिली फेरी पार पडली. 14 टेबलवर ही मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे.

मतमोजणी दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने आवश्यक तो बंदोबस्त तैनात केला आहे. आज सकाळी 8 वाजता टपाली मतदानाबरोबरच बीयु अर्थात बॅलेट युनिट वरील मतांची मोजणी सुरु झाली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत पंकजा मुंडे यांनी परळी मतदारसंघात 850 मतांची आघाडी घेतली तर आष्टी मतदारसंघात 1300 मतांची आघाडी घेतली असल्याचे मतमोजणीतून स्पष्ट झाले. दरम्यान पहिल्या फेरीत केज, गेवराई व बीडमध्ये पंकजा मुंडे पिछाडीवर आहेत तर परळी आणि आष्टी मतदारसंघात त्या आघाडीवर आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे हे पहिल्या फेरीत 1359 मतांनी आघाडीवर आहेत. पहिल्या फेरी अखेर भाजप महायुतीचे उमेदवार पंकजा मुंडे यांना 20 हजार 396 मते मिळाले आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना 21 हजार 755 मते मिळालेली आहेत.

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.