केज । वार्ताहर
मागील काही दिवसांपासून लाचखोरांविरुध्द होत असलेल्या एसीबीच्या थेट कारवायांमुळे बीड जिल्ह्यात चांगलाच चर्चेत आला आहे. जिजाऊ प्रकरणातील पो.नि.खाडे, पाटबंधारे विभागाचा कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर अन् नगर पालिकेतील अभियंते लाच प्रकरणाच एसीबीने पकडलेले असतानाचा आता धाराशिव एसीबीच्या पथकाने शुक्रवारी रात्री 10 वाजता रेशन दुकानावर कारवाई न करण्यासाठी 20 हजार रूपयांची लाच घेणारा केजमधील कोतवाल रंगेहाथ पकडला. दरम्यान या प्रकरणात तसेच केजचा तहसीलदार अभिजित जगताप यात आरोपी असून तो फरार झाला असल्याची माहिती एसीबीच्या सुत्रांनी दिली.
मच्छिंद्र माने असे एसीबीने कारवाई केलेल्या कोतवालाचे नाव आहे. एसीबीच्या माहितीनुसार, माने हा कोतवाल असून तहसीलदार जगताप याच्यासाठी वसूलीचे काम करत होता. केज तालुक्यातीलच एका रेशन दुकानदारावर कारवाई प्रस्तावित होती. ती न करण्यासाठी तहसीलदार जगताप याने 20 हजारांची लाच मागितली होती. हीच लाच कोतवाल माने याने स्विकारली. परंतू तहसीलदार जगताप हा फरार झाला आहे.ही कारवाई धाराशिव येथील पथकाने दरम्यान, दरम्यान बीड जिल्ह्यातील लाचखोरीचे सत्र सूरूच आहे.
Leave a comment