बीड जिल्ह्याचा विभागात सर्वाधिक 97.40 टक्के निकाल

विभागात प्रथम येण्याची परंपरा यावर्षीही राहिली कायम

बीड | सुशील देशमुख

 राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल आज 27 मे रोजी दुपारी 1 वाजता बोर्डाने ऑनलाईन जाहीर केला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वप्रथम येण्याचा मान यंदाही बीड जिल्ह्याने पटकावला आहे. बीड जिल्ह्याचा विभागामध्ये सर्वाधिक 97.40 टक्के निकाल लागला आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्हा दुसऱ्या स्थानी असून जालना तिसऱ्या तर परभणी जिल्हा तिसऱ्या स्थानी असल्याचे बोर्डाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

The result of the school certificate examination i.e. class 10th exam conducted in March 2024 on behalf of the state education board has been announced online today on May 27 at 1 pm.  This year also Beed district has won the honor of coming first in Chhatrapati Sambhajinagar division.  Beed district has got the highest result in the division with 97.40 percent.  It is clear from the data of the board that Chhatrapati Sambhaji Nagar district is at the second position, Jalna is at the third position and Parbhani district is at the third position.

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर झालेल्या निकालामध्ये बीड जिल्ह्याचा सर्वाधिक 97.40 टक्के निकाल लागला असून छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचा 95.51टक्के इतका निकाल लागला आहे जालना 94.99 टक्के परभणी 93.03 टक्के आणि हिंगोली जिल्ह्याचा 92.52 टक्के इतका निकाल लागला आहे.

मार्च 2024 मध्ये इयत्ता दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी बीड जिल्ह्यातून 23 हजार 974 मुले तर 18 हजार मुली असे एकूण 41 हजार 983 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले होते. यापैकी 23 हजार 765 मुले व 17 हजार 806 मुली अशा एकूण 41 हजार 571 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. या परीक्षेचा आज निकाल जाहीर झाल्यानंतर 23 हजार 11 मुले उत्तीर्ण झाले असून 17 हजार 483 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. दहावीच्या परीक्षेत एकूण 40 हजार 494 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या सर्वांचा एकत्रित निकाल 97.40 टक्के इतका लागला आहे.Class X exam was conducted in March 2024.  A total of 41 thousand 983 students from Beed district, 23 thousand 974 boys and 18 thousand girls, had applied for this exam.  Out of these 23 thousand 765 boys and 17 thousand 806 girls, a total of 41 thousand 571 students appeared for the 10th class examination.  After the announcement of the result of this examination today, 23 thousand 11 boys have passed and 17 thousand 483 girls have passed.  A total of 40 thousand 494 students have passed the 10th class examination and the combined result of all these is 97.40 percent.

 

मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 98.18 टक्के

मार्चमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत बीड जिल्ह्यातून 18 हजार 9 मुलींनी परीक्षेसाठी अर्ज केले होते.-यापैकी 17 हजार 806 मुलींनी परीक्षा दिली, पैकी 17 हजार 483 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 98.18 टक्के इतके आहे. दुसरीकडे मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 96.82 टक्के इतकी आहे; कारण मुलांच्या तुलनेत दहावीची परीक्षा देणाऱ्या मुलींची संख्या तुलनेने खूप कमी आहे, हे आकडेवारीवरून स्पष्ट होते दहावीच्या परीक्षेसाठी 23 हजार 974 मुलांनी बोर्डाकडे अर्ज केले होते. पैकी 23 हजार 765 मुलांनी परीक्षा दिली. यापैकी 23 हजार 11 मुले परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.

विभागात प्रथम येण्याची परंपरा कायम

दहावीच्या परीक्षेत यापूर्वीही बीड जिल्हा छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये सर्वप्रथम राहिलेला आहे. हीच परंपरा यावर्षीही कायम राहिल्याने विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. दरम्यान वर्षभर घेतलेल्या परिश्रमाचे चीज झाल्याने पालक वर्गातूनही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले जात आहे. आज दुपारी ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड मोठे उत्सुकता दिसून आली.

तालुकानिहाय निकाल पुढीलप्रमाणे

बीड 97.87 टक्के

पाटोदा 98.60 टक्के

आष्टी 98.08 टक्के

गेवराई 97.24 टक्के

माजलगाव 96.23 टक्के

अंबाजोगाई 96.50 टक्के

केज 97.49 टक्के

परळी 96.99 टक्के

धारूर 96.33 टक्के

शिरूर कासार 98.38 टक्के

वडवणी 97.76 टक्के

रिपीटरचा लागला 66.36 टक्के निकाल

दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मार्चमध्ये परीक्षा झाली होती.या परीक्षेसाठी जिल्ह्यात 416 मुले व 236 मुली अशा 687 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते, पैकी 399 मुले व २६४ मुली अशा 663 विद्यार्थ्यांनी दहावी बोर्डाची परीक्षा दिली  यापैकी 259 मुले व 181 मुली असे एकूण 440 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत या सर्वांचा एकत्रित निकाल 66.36% इतका लागला आहे. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.