बीड | वार्ताहर

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. या काळात बँकांनी खातेधारकांच्या खात्यात अनाधिकृतपणे जमा होणाऱ्या रकमेबाबत जिल्हा प्रशासनास तातडीने कळवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी रविवारी बँकांच्या सोबत झालेल्या बैठकीत केले. 
यावेळी उपविभागीय अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कविता जाधव, उपजिल्हानिवडणूक अधिकारी  महेंद्रकुमार कांबळे उपस्थीत होते. 

बीड जिल्ह्यात चौथ्या टप्प्यात मतदान होणार असून यादरम्यान मतदारांना प्रभावित करण्यासाठी राजकीय पक्ष बँकांच्या विविध प्रणालीच्या माध्यमातून खातेधारकांच्या खात्यात एक सारख्या रकमी जमा करू शकतात. अशावेळी बँकांनी सावध राहून ही बाब जिल्हा प्रशासनाच्या लक्षात त्वरित आणून द्यावी. 
 
अशा पद्धतीने खातेधारकांच्या खात्यात जमा करणे आचार संहितेला धरून नसल्याने यावर संबंधित राजकीय पक्षांवर  गुन्हा दाखल होऊ शकतो तसेच संबंधित बँकावर पण कारवाई केली जाईल, यामुळे बँकांनी निवडणुकीच्या काळात दक्ष रहावे अशी अपेक्षा जिल्हाधिकारी यांनी यावेळी व्यक्त केली. 

आज जिल्ह्यातील प्रिंटर पब्लिशर सोबतही बैठक पार पडली. राजकीय पक्षांनी प्रसिद्ध केलेले माहिती पुस्तिका,  पॅम्प्लेट्स आणि इतर साहित्य यावर स्पष्टपणे प्रकाशकाचे नाव असावे तसे नसल्यास संबंधित प्रकाशकावर आणि राजकीय पक्षावर गुन्हा दाखल केल्या जाईल, असे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.