बीड । वार्ताहर

 

 

महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात कार्य करून आपला ठसा निर्माण करणार्‍या उसतोड कामगार संघटनेच्या मनिषा तोकले यांचा सावित्रीबाई फुले सन्मान सोहळा 2024 मध्ये विशेष सन्मान केला.13 मार्च रोजी संत नामदेव सभागृह, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सकाळी 11 वाजता हा सन्मान सोहळा संपन्न झाला.

 

सावित्रीबाई फुले सन्मान सोहळ्याचे हे पाचवे वर्ष आहे. या अगोदरही विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणार्‍या महीलांचा सन्मान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने करण्यात आला आहे. यंदाच्यावर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य श्रीमती बागेश्री मंठाळकर  यांच्या अध्यक्षतेखालील कार्यरत शोध समितीने मनिषा तोकले यांनी उसतोड कामगार महिलांच्या संघटना निर्माण करून त्यांच्या न्याय हक्का साठी लढा दिला. उसतोड कामगार महीलांचा गर्भ पिशवीच्या ऑपरेशन चा मुद्दा ऐरणीवर आणला. महीला किसान अधिकार मंचच्या मदतीने आत्महत्या ग्रस्त शेतकरी परिवारातील महीलांचे प्रॉपर्टी राईट्सचे  प्रश्न हाताळले, बाल विवाहाचा प्रश्नाला वाचा फोडली, या त्यांनी केलेल्या कार्या बद्दल सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा, अकरा हजार रुपये व विद्यापीठाची शाल देवून मनिषा तोकले यांचा सन्मान करण्यात आला. हा सन्मान सोहळा विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ सुरेश गोसावी, यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. तसेच प्र कुलगुरू डॉ पराग केळकर, कुलसचिव प्रो. डॉ विजय खरे, यांच्या प्रमुख उपस्थितीत  हा सोहळा संपन्न झाला. याच सन्मान सोहळ्यात भारुडकार पद्मजा कुलकर्णी, जागृती अंध कन्या विद्यालयाच्या सकिना बेदी, हायजिन फस्टच्या वैशाली गांधी, योगा  अभ्यासक प्रज्ञा पाटील यांचाही सन्मान करण्यात आला.  
 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.