स्थागुशाची कारवाई आरोपीकडून तीन जिंवत काडतुसेही जप्त

 

बीड । वार्ताहर

बेकायदेशीरपणे अग्निशस्त्र घेवून फिरणार्‍या एका तरुणास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेत जेरबंद केले. आज 5 मार्च रोजी शहरातील तुळजाई चौकात ही कारवाई करण्यात आली.

 

 

राहुल प्रकाश तुपे (वय 27 रा.शिरापुर ह.मु.गोविंदनगर, बीड) असे आरोपीचे नाव असल्याचे गुन्हे शाखेच्या पोलीसांनी सांगितले. एक तरुण कमरेला गावठी कट्टा लावून उभा असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक श्रीराम खटावकर यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी पथकासह तुळजाई चौकात जावून तेथे आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्या कमरेला लावलेली एक गावठी लोखंडी पिस्तूल व 3 जिवंत काडतूस असा एकूण 43 हजारांचा मुद्देमाल त्याच्याकडून जप्त करण्यात आला. आरोपीविरुध्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिवाजीनगर पोलीसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी करत आहेत.

 

आगामी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने  विशेष पोलीस महानिरीक्षकांनी अवैध अग्निशस्त्र बाळगणार्‍यांविरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार  पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. संतोष साबळे, उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोह. मनोज वाघ, प्रसाद कदम, पोना. विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, पोशि. सचिन आंधळे, पोशि. विकी सुरवसे, नारायण कोरडे, चालक सुनिल राठोड यांनी ही कामगिरी केली.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.