बीड । वार्ताहर
शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील टेलिफोन कॉलनी भागात घरपोडीची घटना समोर आली. चोरट्यांनी घरबंद असल्याची संधी साधून कुलूप तोडून घराच्या कपाटातील सोन्याचे विविध दागिने चोरून नेले.दि.2 ते 4 मार्चच्या दरम्यान ही घटना घडली.
अनिल ज्ञानोबा विश्वाद (वय 61) यांनी याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यांचे धानोरा रोड भागातील टेलिफोन कॉलनीत घर आहे. एका कामानिमित्त ते पुणे येथे गेलेले होते. या दरम्यान त्यांचे घर कुलूप बंद होते. चोरांनी या घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. कपाटातील 40 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या 5 ग्रॅम वजनाच्या 2 अंगठ्या तसेच 12 हजार रुपये किमतीचे सोन्याचे इतर दागिने असा एकूण 52 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. पुण्याहून घरी परतल्यानंतर हा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरुन अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment