बीड । वार्ताहर

 

बीड वार्ताहर शिरूर कासार तालुक्यातील तागडगाव परिसरात विद्युत पंप आणि पाईप चोरून नेणार्‍या चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातल्याचा प्रकार 4 मार्चच्या पहाटे उघडकीस आला. याप्रकरणी शिरूर कासार पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

 

शेतकरी सचिन मिठू कुलकर्णी (रा. तागडगाव, ता.शिरूरकासार) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. कुलकर्णी यांची तागडगाव शिवारात शेती आहे; त्या शेतामध्ये सध्या त्यांनी ऊस व इतर पिके घेतलेले आहेत. या पिकांना ते उथळा तलावावरील विहिरीतून पाणी देतात. 3 मार्च रोजी विद्युत पंप सुरू करून पिकांना पाणी देऊन कुलकर्णी सायंकाळी पंप बंद करून घरी गेले होते. नंतर मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या विहिरीवरील 15 हजार रुपये किमतीचा विद्युत पंप आणि 5 हजार रुपये किमतीचा पाईप चोरुन

 

 

सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर सचिन कुलकर्णी यांनी आजूबाजूच्या शेतकर्‍यांकडे याबाबत विचारपूस केली असता गावातील त्यांच्या विहिरीच्या आसपास असलेल्या ज्ञानदेव पवार, प्रल्हाद पवार, भागवत सानप, श्रीराम सानप व चंद्रकांत सानप या पाच शेतकर्‍यांच्या विहिरीवरील विद्युत पंप चोरट्यांनी चोरून नेल्याचे लक्षात आले. कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीवरून विद्युत पंप आणि पाईप चोरी झाल्याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब सोनवणे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.