तलवाडा पोलीसांसमोर चोरट्यांचे आव्हान
बीड । वार्ताहर
गेवराई तालुक्यातील सिरसदेवी फाटा येथील दोन किराणा दुकानाचे पत्र्याचे शटर उचकटून चोरट्यांनी आतमधील रोख रक्कम आणि किराणामाल चोरून नेला.ही घटना 3 ते 4 मार्चच्या मध्यरात्री ते सकाळच्या सुमारास घडली. दरम्यान चोरट्यांनी तलवाडा पोलीसांना एकप्रकारे आव्हान दिल्याची चर्चा परिसरात या घटनेनंतर झाली.
याबाबत आदित्य विठ्ठल थोपटे (रा.अर्धमसला,ता.गेवराई) यांनी तलवाडा ठाण्यात तक्रार नोंदवली. थोपटे यांचे सिरसदेवी फाटा येथे विठाई हे किराणा दुकान असून त्यांच्या दुकानाच्या शेजारी त्यांच्या मित्राचे जय हनुमान किराणा दुकान आहे. 3 ते 4 मार्चच्या मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी या दोन्ही दुकानांचे पत्रे उचकटून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर दोन्ही दुकानाच्या गल्ल्यातील रोख रक्कम व किराणा माल असा एकूण 67 हजारांचा माल चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर आदित्य थोपटे यांनी तलवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधिक तपास करत आहेत.
Leave a comment