बीड । वार्ताहर
शहरातील मध्यवर्ती बस स्थानकात एका नागरिकाच्या खिशातील 2 हजार 300 रुपयांची रोख रक्कम आणि एक 8 हजार रुपये किमतीचा मोबाईल असा 10 हजार 300 रुपयांचा आयबॉल चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन हा तो हात लंपास केला.
ही घटना 28 फेब्रुवारी रोजी पहाटे 1.30 ते 2 वाजेच्या सुमारास बस स्थानकातील पत्र्याच्या शेड जवळ घडली. या प्रकरणी परमेश्वर एकनाथ आगाम (रा.पिंपरगव्हाण, ता.बीड. ह.मु.बीड) यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस हवालदार घोळवे या प्रकरणाचा तपास करत आहेत
Leave a comment