गेवराई । वार्ताहर
शहरातील गजानन नगर कोल्हेर रोड भागात एका किराणा दुकानात अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने केलेल्या कारवाईत राज्यात विक्री प्रतिबंधित केलेला 24 हजार 820 रुपये किमतीचा गुटखा पान मसाला जर्दा आणि सुगंधी तंबाखूचा माल जप्त करण्यात आला.
28 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी अन्नसुरक्षा अधिकारी महेंद्र बापूराव गायकवाड यांनी फिर्याद नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी अमर अजित शेख (रा. संजयनगर, गेवराई) याच्याविरुद्ध किराणा दुकानात मानवी आरोग्यास अपायकारक व घातक असलेला गुटखा व तंबाखूचा साठा विक्रीसाठी साठवणूक केल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला.
Leave a comment