आज अनिल महाराज माखले यांचे कीर्तन
बीड: तालुक्यातील जिरेवाडी येथे सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहास गुरुवार, 22 फेब्रुवारी रोजी श्री क्षेत्र रामगड संस्थानेच मठाधिपती स्वामी योगीराज महाराज यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. आज शुक्रवारी रात्री 9 ते 11 यावेळेत भरत महाराज जोगी यांचे कीर्तन होणार आहे.
दरम्यान या सप्ताहात दररोज ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, काकडा असे कार्यक्रम होणार आहेत. तर कान्हु महाराज गायके, पांडुरंग महाराज रांजवण, शरयू महाराज तकिक, गंगाधर महाराज भालेकर, मसुराम महाराज कदम, नवनाथ महाराज नाईकवाडे, शिवाजी महाराज नेवडे यांचे प्रवचन होणार आहेत. तर आण्णा महाराज शेळके, भरत महाराज जोगी, अनिल महाराज माखले, अक्षय महाराज पिंगळे, सुधाकर महाराज वाघ, नवनाथ महाराज वडगावकर, आदीनाथ महाराज लाड यांनी दररोज रात्री 9 ते 11 या वेळेत कीर्तन सेवा होणार आहे. तर सांगता 29 फेब्रुवारी रोजी स्वामी योगीराज महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार असून त्यानंतर लगेच महाप्रसाद होणार आहे. याचा पंचक्रोशितील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिरेवाडी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.
Leave a comment