शहरात खळबळ; पोलीस घटनास्थळी
बीड | वार्ताहर
बीड नगरपालिका कर्मचारी नालेसफाई करत असताना नालीत एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला.जेसीबीच्या खोऱ्यात अडकून हा मृतदेह वर आल्यानंतर काम करणाऱ्या नगरपालिका कर्मचाऱ्यांसह परिसरात एकच खळबळ उडाली. ही माहिती मिळताच शहर ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. ही घटना बुधवारी दुपारी शहरातील सुभाष रोडवर घडली.
सुभाष रोडवरील एका कापड दुकानाच्या लगत नाल्यामध्ये नगर पालिकेचे कर्मचारी साफसफाई करत होते. जेसीबीला अडकून मृतदेह नालीतून वर आला. त्यानंतर कर्मचारी सदरील मृतदेह वरती काढल्यानंतर पाहणी केली असता मृतदेह हा पूर्णपणे सडलेला आढळून आला असून याबाबत तात्काळ शहर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी करून सदरील मृतदेह जिल्हा रूग्णालयात दाखल केला. सदरील मृतदेह कोणाचा आणि तो व्यक्ती नालीत पडला की यामागे काही घातपात तर नाही ना या सर्व बाजूने पोलीस तपास करणार आहेत.
Leave a comment