बीड |वार्ताहर
अयोध्या येथे श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा प्रसंगी देशाचे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या मुख्य पूजेचे पौरोहित्य करणारे वेदमूर्ती गजानन दिलीपराव ज्योतकर यांचा संस्कार कॉलनी तर्फे भाऊसाहेब बोबडे,दिलीप चौरे, राजेंद्र आगवान, भगवान सोनवणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्कार कॉलनी मधील श्री दत्तात्रय सुलाखे, सतीश महाजन, सतीश गंधे, श्रीराम नवले, रघुनाथ तावरे,मधुरेश ठोसर, शेषेराव क्षीरसागर आणि परिसरातील सर्व नागरिक बंधू -भगिनी यांची उपस्थिती होती. प्रारंभी कॉलनीतील महिलांनी वेदमूर्ती गजानन ज्योतकर यांचे औक्षण केले.
याप्रसंगी कॉलनीवासियांच्या वतीने भाऊसाहेब बोबडे आणि भगवान सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे आयोजन शैलेश खडके परिवार आणि संस्कार कॉलनी परिसरातील नागरिक यांनी केले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील सोनवळकर यांनी केले.तर सर्व उपस्थितांचे सचिन महाजन यांनी आभार व्यक्त केले.
Leave a comment