मुंबई । वार्ताहर

राज्य शासनाने 17 आयएएस आणि 43 आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत.यात बीडचे सुपुत्र मंदार पत्की यांना यवतमाळ जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे,बीडचे पूर्वीचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांची कोल्हापूर येथून बदली झाली असून अमोल येडगे यांना कोल्हापूर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली आहे.नितीन पाटील विशेष आयुक्त, वस्तू आणि सेवा कर, महाराष्ट्र, मुंबई यांची सचिव, राज्य मानवाधिकार आयोग, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

अभय महाजन सचिव, दिव्यांग कल्याण विभाग यांची विशेष आयुक्त, वस्तू आणि सेवा कर, महाराष्ट्र, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संजय एल. यादव सह व्यवस्थापकीय संचालक, मुंबई यांची जिल्हाधिकारी, मुंबई शहर, नियुक्ती करण्यात आली आहे.राहुल रेखावार, जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांची महा राज्य शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणे या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. राजेंद्र क्षीरसागर जिल्हाधिकारी, मुंबई शहर, मुंबई यांची जिल्हाधिकारी, मुंबई उपनगरी जिल्हा, नियुक्ती करण्यात आली आहे. अमोल येडगे,संचालक, महा राज्य शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, पुणे यांना जिल्हाधिकारी, कोल्हापूर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मनुज जिंदाल मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे यांची सहव्यवस्थापकीय संचालक मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

भाग्यश्री विसपुते मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बुलढाणा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य प्रशासक सिडको, छत्रपट्टी संभाजी नगरअवश्यंत पांडा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती यांची आयुक्त, वस्त्रोद्योग, नागपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.वैभव वाघमारे प्रकल्प अधिकारी अहेरी आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, अहेरी उपविभाग,गडचिरोली यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम येथे नियुक्ती करण्यात आली आहे.संजीता महापात्रा प्रकल्प अधिकारी, डहाणू आणि सहायक जिल्हाधिकारी, डहाणू उपविभाग, पालघर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.मंदार पत्की प्रकल्प अधिकारी,तळोदा आणि सहायक जिल्हाधिकारी, तळोदा उपविभाग, नंदुरबार यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.मकरंद देशमुख सहसचिव, मुख्य सचिव कार्यालय, मंत्रालय, मुंबई यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.नतिशा माथूर (संवर्ग गुजरातला महाराष्ट्रात बदलून प्रकल्प अधिकारी, खढऊझ, तळोदा आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, तळोदा उपविभाग, नंदुरबार म्हणून नियुक्त केले आहे.

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.