बीड | वार्ताहर

बीड शहरात खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील तिरुमला, कुटे ग्रुपच्या मालक अर्चना सुरेश कुटे यांचा भाऊ असलेल्या शिवा घरत यांचे 4 कोटींच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले. दरम्यान बीड पोलिसांनीही या प्रकरणात तातडीने कारवाई करत पहाटेच्या सुमारास जिल्ह्यातून दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी करण्यात आली असून या प्रकरणात एका महिलेचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.

 

 

 

 सूत्रांच्या माहितीनुसार, अर्चना कुटे यांचा भाऊ असलेल्या शिवा घरत यांचे गुरुवारी बीडमध्ये काही जणांनी अपहरण केले. या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. शिवा घरत यांच्या अपहरण प्रकरणात अर्चना कुटे यांच्याकडे 4 कोटींची खंडणी मागण्यात आल्याची माहिती आहे. यातील आरोपी असलेल्या महिलेसह अन्य एक जणाला तलवाडा फाट्यावरून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.आणखी काही आरोपीची नावे समोर येथील असा अंदाज वर्तवला जात आहे. पोलिसांकडून या सर्व प्रकरणाचा कसून तपास केला जात आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.