माजलगाव । वार्ताहर

माजलगाव एसडीएम ऑफीस अर्थात उपविभागीय कार्यालयात कार्यरत असलेल्या एका लिपिकास एका प्रकरणात 30 हजारांची लाच घेताना ‘एसीबी’च्या पथकाने रंगेहात पकडले. आज बुधवारी (दि.24) रोजी दुपारी ही कारवाई करण्यात आली.   या कारवाईने एसडीएम कार्यालयात एकच खळबळ उडाली.

 

वैभव जाधव असे लाच घेताना पकडलेल्या कारकूनाचे नाव आहे. माजलगाव विभागीय कार्यालयात कार्यरत असलेल्या वैभव जाधव यांच्याकडे या कार्यालयातील गौण खनिज व जातीचे प्रमाणपत्र हे विभाग होते. पकडलेली वाळूची गाडी सोडण्यासाठी 30 हजार रुपयाची लाच घेतांना त्यांना बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.