शिरुर कासार । वार्ताहर
आदर्श शिक्षण संस्था बीड संचलित पाडळी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाडळी तालुका शिरुर कासार येथे संस्थेचे कर्तव्यदक्ष प्रशासन अधिकारी डॉ. राजुजी मचाले यांनी 19 रोजी भेट देऊन इमारत सर्व विभागाच्या अभिलेखाची तपासणी केली कामकाज पाहून प्रशासक डॉ. मचाले यांनी समाधान व्यक्त केले.
प्राचार्य अगंदराव दहिफळे यांनी पदभार घेतल्यापासुन पाडळी उच्च माध्यमिक विद्यालयाची इमारत रंगरंगोटी करुन भिंतीवर महापुरुषांची चित्रे व सुविचार रंगवून इमारतीच्या वैभवामध्ये मोठी भर पाडली तसेच वृक्षारोपण पाणी सुविधा भव्य क्रिडागंण शौचालय किचन शेड ग्रंथालय प्रयोग शाळा लिपीक विभाग विद्यालयाचा भव्य दिव्य बोर्ड आदि महत्वपूर्ण कामे प्राचार्य दहिफळे यांनी केली आहेत. विद्यालयाचे वातावरण पाहून डॉ. मचाले यांनी प्राचार्य दहिफळे यांचे कौतुक केले तसेच सर्व विभागाचे सर्व अद्यावत कामकाज पाहीले तसेच विद्यालयात सुरु असलेल्या तालुका स्तरीय पाच दिवसांच्या अध्यापन प्रक्रियेचे व्यवस्थापन प्रक्षिशणाला डॉ.मचाले यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले डॉ. मचाले यांचे स्वागत प्राचार्य अगंदराव दहिफळे यांनी केले यावेळी सर्व कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a comment