केएसबीएल ग्रुपच्या भव्य प्रकल्पाला प्रचंड प्रतिसाद
अंबाजोगाई | वार्ताहर
काझी-संघाणी-बागवान लोमटे ग्रुपचा नाविन्यपुर्ण प्रकल्प असलेल्या 'सटवाजी ड्रीम सिटी' या प्लॉटस् रो-बंगलोज व फ्लॅट चा विस्तीर्ण ३१ एकर वरील टाऊनशीप प्रकल्पाचे दि.१२ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता मान्यवर प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार यांच्या उपस्थितीत व के. एस . बी .एल संचालक समीर काझी, अतुल संघाणी, शकील शेख, अनंतदादा लोमटे, कुणाल लोमटे यांच्यासह त्यांचे आई-वडील तसेच विष्णु तात्या शेप, नाना शेप व त्यांचे बंधु यांच्या हस्ते शानदार उदघाटन करण्यात आले. अंबाजोगाई शहरात प्रथमच ही ३१ एकरची भव्यदिव्य टाऊनशिप आहे.केएसबीएल ग्रुपच्या भव्य प्रकल्पाला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून आपले स्वप्नातील आकर्षक घर , प्लाट घेण्यासाठी नागरिकांनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन याप्रसंगी केएसबीएल ग्रुपचे करण्यात आले.
सटवाजी ड्रीम सिटी ही अंबाजोगाई शहरात मध्यवस्तीमध्ये 31 एक्करची भव्य दिव्य नाविन्यपूर्ण रचनात्मक टाऊनशिप काझी-संघाणी - बागवान- लोमटे ग्रुपच्या माध्यमातुन निर्माण झाली आहे. या सटवाजी ड्रीम सिटीमध्ये सर्व रस्ते 30 फुट व 40 फुट चे असुन, सिमेंट रोड केलेले आहेत. यामध्ये अंडर ग्राउंड ड्रेनेज, अंडरग्राउंड इलेक्ट्रिक वायरिंग, अद्ययावत सुशोभित गार्डन, लहान मुलांची खेळणी, ओपन जीम, आकर्षक कमान, इट्री गेट , गणेशजी मंदीर, कॉलनीसाठी स्वंतंत्र डीपी , ले-आऊटला कंपाउंडवॉल जॉगिंग ट्रैक, आराम दायी बँचेस प्रवेशद्वारा वर सीसीटीव्ही, टर्फ क्रिकेट (paid ) ची व्यवस्था प्लॉट धारकांसाठी केलेली आहे.
सदरील ड्रीम सिटीमध्ये बंगलो प्लॉटससह, रो-बंगलो, 2 बीएचके , २ बीएचके फ्लॅटस विक्रीस तयार आहेत. हा प्रकल्प अंबाजोगाई - परळी मुख्य रस्त्यावर असून शाळा, कॉलेज, मार्केट अगदीच हाकेच्या अंतरावर असल्याने या प्रकल्पाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांनी या अद्यावत प्रकल्पात बुकिंग करावी यासाठी केएसबीएल ग्रुपच्या वतीने येत्या 31 जानेवारी पर्यंत आकर्षक भेट ठेवलेली असून याचा लाभ घेण्यासाठी अंबाजोगाई शहर व परिसरातील सर्व इच्छुकांनी भेट द्यावी असे आवाहन केएसबीएल ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.
Leave a comment