परळी । वार्ताहर
परळी तालुक्यातील मालेवाडी रोडवर एका निर्दयी मातेने पोत्यात गुंडाळून फेकलेले एका आठ महिन्यांचे स्त्री जातीचे बाळ सापडले या घटनेस चार दिवस उलटत नाही तोच आज परळी नंदागौळ रोडवरील कचर्याच्या डम्पिंग लगत एक तीन दिवसीय स्त्री जातीचे अर्भक सापडल्याने परळी शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
सदर अर्भक परळी ग्रामीण पोलिसांनी हस्तगत करून उपचारार्थ परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. चार दिवसांपूर्वी परळी तालुक्यातील शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर मालेवाडी रोडवर एका निर्दयी मातेने आठ महिन्याच्या स्त्री जातीच्या मुलीस पोत्यात गुंडाळून फेकले होते त्यावेळी परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम आणि टीमने सदर मुलीस हस्तगत करून उपचारार्थ परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. सदर घटनेस 72 तास उलटत नाही तोच गुरुवारी (दि.11) रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास पुन्हा परळी नंदागौळ रोडला कचर्याच्या डम्पिंग ग्राउंड लगत एक तीन दिवसीय अर्भक कपड्यात गुंडाळून फेकले असल्याची माहिती वसंतनगरला जाणार्या एका अज्ञात इसमाने परळी ग्रामीण पोलिसांना दिली. सदर घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण गीते, पोलीस उपनिरीक्षक गणेश झांबरे, तुळशीराम परतवाडे, व्यंकट डोरनाळे, महादेव वाघमारे आदींनी त्वरित घटनास्थळ घाटीत सदर अर्भकास ताब्यात घेऊन उपचारार्थ परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले प्रभाकर उपचार सुरू असून तब्येत चांगली आहे.
Leave a comment