बीड । वार्ताहर

 

महाराष्ट्र संशोधन उन्नती प्रशिक्षण संस्था अर्थात अमृत पुणेचे प्रकल्प संचालक तथा ध्रुव आयएएस अकादमीचे प्रमुख विनोद देशपांडे आणि महाराष्ट्र संशोधन उन्नती प्रशिक्षण संस्थेच्या निबंधक डॉ.प्रियाताई देशपांडे यांनी बुधवारी (दि.10) बीड येथे येऊन खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांशी चर्चा करत त्यांना अमृत विषयी सविस्तर माहिती दिली.

या माध्यमातून राबवले जात असलेले उपक्रम आणि त्याचा खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांना कशाप्रकारे लाभ घ्यावा त्यासाठी लाभार्थ्यांनी कोणती कागदपत्रे पूर्ण करून आपला स्वतंत्र अर्ज दाखल करावा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी नागरिक उपस्थित होते. यावेळी उपस्थित लाभार्थ्यांच्या मनात असलेल्या शंका आणि त्याची उत्तरेही त्यांनी दिली. महाराष्ट्र संशोधन उन्नती प्रशिक्षण संस्था अमृत या संस्थेद्वारे खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी अमृत महामंडळ काम करत असून स्वयंरोजगारासाठी या घटकाला प्रोत्साहन प्रशिक्षण व लघु उद्योजक निर्मिती अशी राज्य शासनाची योजना असल्याचे यावेळी दोन्ही मान्यवरांनी सांगितले. लघुउद्योजक होण्यासाठी अमृतच्या माध्यमातून स्वतःचा पहिला नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्याही वयाची अट नाही तसेच आर्थिक दुर्बल घटकातील  महिला भगिनीही या योजनेचा लाभ घेऊ शकतात हे यावेळी डॉ. प्रियाताई देशपांडे यांनी विस्ताराने मार्गदर्शन करत सांगितले. तसेच यावेळी डॉ. प्रिया देशपांडे यांनी कृषी आणि शैक्षणिक योजना संबंधी विस्ताराने माहिती दिली. लघुउद्योजक होण्यासाठीच्या कोणत्याही टप्प्यावर काही अडचणी आल्या अथवा मार्गदर्शन हवे असल्यास त्याबाबत अमृतची स्वतंत्र वेबसाईट अर्थात संकेतस्थळ सुरू करण्यात आले असून त्यावर वेळोवेळी अपडेट माहिती उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

या प्रसंगी अ‍ॅड. रवींद्र देशमुख चंद्रकांत जोशी, ऍड अजिंक्य पांडव, पूर्णवादी बँकेचे अधिकारी महेश पारगावकर, हिंगणिकर साहेब,  प्रमोद कुलकर्णी,सागर कुलकर्णी, बाळासाहेब खडकीकर,अक्षय भालेराव, भालचंद्र कुलकर्णी, दीपक सर्वज्ञ, प्रशांत लव्हूरीकर, सुशील देशमुख, लक्ष्मीकांत देशमुख, नितेश कुलकर्णी,किरण देशमुख, विकास सर्वज्ञ, निलेश सर्वज्ञ आदी आदींसह समाजातील मान्यवर जेष्ठ नागरिक उपस्थित होते. लघु उद्योजक होण्यासाठी आवश्यक असलेले अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) असल्याबाबतचे प्रमाणपत्र विहित कालावधीत मिळवून घ्यावे असे आवाहन त्यांनी केले

 

.अमृत संस्थेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना स्वयंरोजगाराबाबतचे प्रशिक्षण देणे तसेच निकष व आवश्यक असलेले कागदपत्रे आणि विविध बँका पतसंस्था यांच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करण्यासाठी व त्या माध्यमातून स्वतःचा रोजगार मिळवण्यासाठी खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांना अर्थसाह्य निर्माण करून देणे यासाठी काम केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी उपस्थित त्यांनी आपल्या मनातील प्रश्न विचारून त्याबाबत दोन्ही मान्यवरांकडून मार्गदर्शन घेतले. याप्रसंगी डॉ. प्रियाताई देशपांडे यांचे स्वागत चंद्रकांत जोशी तर विनोद देशपांडे सरांचे स्वागत पत्रकार सुशील देशमुख यांनी केले. याप्रसंगी विभागीय समन्वयक दीपक जोशी आणि बीड जिल्हा समन्वयक विशाल जोशी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.