अंबाजोगाई । राहूल देशपांडे
येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेचे व राष्ट्रीय छात्र सेनेचे माजी विद्यार्थी सागर संजय कुलकर्णी यांनी हिमाचल प्रदेशातील धौलधर पर्वतरांगात कांडल जिल्हा येथे साहसी प्रशिक्षणासाठी म्हणजेच ट्रेकिंग पॅराग्लायडिंग. ज्या ठिकाणी -3 अंश तापमान असते, अत्यंत कठीण व जीवावर बेतणारे पण तेवढीच रोमहर्षक असणारी ठिकाण पॅराग्लायडिंग साठी धाडस केले आहे
राजगुंदा व्हॅली ट्रेक आणि कॅम्पिंग व गुनेहार धबधबा ट्रेक. अत्यंत अवघड परंतु प्रचंड इच्छाशक्ती, आत्मविश्वास,एकाग्रता, संयम,धाडस दाखवून यशस्वीरित्या पूर्ण केली. त्या भागात हाड गोठवणारी थंडी आणि भयभीत करणारी उंच शिखरे.अशा वातावरणात ट्रेकिंग पॅराग्लाइडिंग धबधबा या साहसिक खेळ खेळण्यासाठी शारीरिक व मानसिक पातळीवर कसोटी असते. निश्चय व प्रचंड आत्मविश्वास ही शिकवण त्यास छात्र सेनेत मिळाली त्यामुळे सागर याला धाडसी मोहिमा करण्याचा छंद जडला. सागर कुलकर्णी याच्या रक्तातच निसर्गविषयी जिव्हाळा, वृक्षवेली,डोंगर,पर्वत यावर आम्हाला आमच्या वडिलांनी प्रेम करायला शिकविले. इतर पालकाप्रमाणे सागर च्या पालकास मुलांनी मोठे व्हावे काहीतरी वेगळे करावे असे वाटे. बारावी मध्येच असताना त्यास फोटोग्राफीचा छंद लागला.
फोटोचे कौतुक होऊ लागले. पुण्यात शिक्षण घेत असताना आमचे वडील आम्हाला लहानपणापासूनच गड, किल्ले दाखवणे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणे.गड,किल्ले रोमहर्षक इतिहास सांगत असत त्यामुळे निसर्गा विषयी जिव्हाळा निर्माण झाला.सह्याद्री पर्वतरांगातील किल्ले, गड, निसर्गाचे फोटो काढून निसर्ग पर्यटनाला चालना मिळावी म्हणून तो निसर्गाशी एकरूप झाला त्याने सह्याद्री रांगांमध्ये अवघड असे ट्रेनिंग धबधबा,पाण्यातील टॅपलिंग असे साहसी उपक्रम राबविले. त्याचाच भाग पॅराग्लायडिंग म्हणजे आकाशात उंच उडणे गगन भरारीचा प्रयोग केला. त्यातून एकच उद्देश म्हणजे भारत नव्हे तर जगभ्रमण करणे व निसर्ग सौंदर्य टिपणे आहे. त्याच्या या यशस्वी चढाई बद्दल योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेश खुरसाळे रोटरी चे कल्याण कुलकर्णी, रामभाऊ कुलकर्णी, मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख,भूषण क्षीरसागर,राजकिशोर मोदी, प्रा.एम.एस. लोमटे,प्रा.एन के गोळेगावकर,वैभव चौसाळकर जयहिंद ग्रुप चे सुभाष शिंदे यांच्यासह अनेकांनी कौतुक करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत
Leave a comment