अनिल जगताप यांचा आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह
शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश

 


बीड । वार्ताहर

महाराष्ट्राच्या इतिहासात पाचशेपेक्षा अधिक गाड्यांचा ताफा घेऊन शिवसेनेत प्रवेश करणारा अनिल जगताप हा पहिला शिवसैनिक आहे. आजपर्यंत बाळासाहेब तथा शिवसेनेप्रति असणारी अनिलची निष्ठा आणि प्रामाणिकता पायदळी तुडवण्याचे काम करण्यात आले. परंतु अवघ्या महाराष्ट्रास स्वतःचं कुटुंब मानणारा हा कष्टकरी, शेतकरी, सामान्यांचा मुख्यमंत्री, बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक एकनाथ शिंदे कधीच अनिल जगताप यांच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही. आजवर बीडकडे अनेकांनी दुर्लक्ष केले पण इथून पुढे बीडवर माझे विशेष लक्ष राहील असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

9 जानेवारी 2024 रोजी उशिरा रात्री मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवास्थानी  उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अनिलदादा जगताप यांनी सरपंच, नगरसेवक, पदाधिकारी तथा आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यादरम्यान एकनाथ शिंदे यांनी बीडमधून आलेल्या सर्व शिवसैनिकांचा हृदय सत्कार करून स्वागत केले आणि त्यांच्याशी मुक्त संवाद साधला. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, गेल्या चाळीस वर्षांपासून बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना अनिलदादा जगताप यांनी बीडमध्ये जिवंत ठेवली. पण उद्धव ठाकरे यांनी बीड जिल्ह्याकडे आणि वैयक्तिक त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. पण आता असे होणार नाही. अनिलची निष्ठा आणि प्रमाणिकता मला माहित आहे त्यामुळे इथून पुढे बीडकडे माझे विशेष लक्ष राहील. महाराष्ट्र राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपण अनेक निर्णय घेतले, अनेक प्रश्न सोडवले, महिला सक्षीमीकरण असेल तसेच गोरगरीब शेतकर्‍यांसाठी देखील आपण पुढाकार घेऊन त्यांच्या अडचणी सोडवल्या. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात बदल घडवण्याचा प्रयत्न आपण सरकारच्या माध्यमातून करत आहोत.

 

 

शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, विद्यार्थी विद्यार्थिनी यांना दिलासा देणारे अनेक निर्णय आपण आजवर घेतले असून ते लोकांपर्यंत पोहचवून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी एकदिलाने कामाला लागा असे आवाहन यावेळी केले. बाळासाहेबांनी, दिघे साहेबांनी आपल्याला देत राहण्याचे संस्कार बिंबवलेले आहेत त्यामुळे आपण त्यापद्धतीने कार्य करत आहोत. लक्षात घ्या, अनेकांना वाटलं हे टिकणार नाहीत, याचं सरकार पडणार पण बाळासाहेब, दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने शिवसेनेत दररोज प्रवेश होत आहेत. याचबरोबर मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टिकेची झोड लावली. बीडमध्ये शिवसेनेचा मेळावा होणार आहे निश्चितच यावेळी उपस्थित राहील. बीडवासियांसाठी मी अनेक सेवा देण्याचे काम करणार आहे. अनिलसह तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला तो मी सार्थ करून दाखवेल. तुमच्यासारखी निष्ठावंत कार्यकर्ते हेच माझे शक्ती आहे. आजपर्यंत जो अन्याय झाला, त्रास झाला तो विसरा माझ्याकडे तुम्हाला सर्वांना न्याय मिळेल. यादरम्यान अनिलदादा जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, वाईट काळात मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी बीडमध्ये शिवसेनेची ताकद राखून ठेवली. शिंदे साहेब तुम्ही आशीर्वाद, सहकार्य ठेवा आपल्या नेतृत्व मार्गदर्शनाखाली अवघे बीड शिवसेनामय करून टाकू असा शब्द मी तुम्हाला देतो. अनिलदादा यांनी बाळासाहेब तथा दिघे साहेब यांच्या नामाचा जयघोष करून शिवसेनेत प्रवेश केला. यादरम्यान संसदरत्न खासदार श्रीकांत शिंदे यांनी अनिलदादा जगताप व त्यांच्या पदाधिकार्‍यांचे सत्कार करून स्वागत केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार भरत गोगावले, आरोग्यसेवक बाजीराव चव्हाण बीड शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, कुंडलिक खांडे आणि अनिलदादा जगताप यांच्यासह बीडमधील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.