बीड । वार्ताहर

जि.प.च्या शिक्षण विभागात जावून तेथे धिंगाणा घालणे एका राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षकास चांगलेच अंगलट आले आहे. शनिवारी केलेल्या या गैरवर्तनाची माहिती सीईओ अविनाश पाठक यांना मिळाली. त्यानंतर सोमवारी त्यांनी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विजय आमटे यास सेवेतून निलंबित केले आहे.या कारवाईने खळबळ उडाली आहे.

आष्टी तालुक्यातील शिक्षक विजय आमटे हे गेल्या काही दिवसांपासून पदोन्नतीची फाईल का काढली नाही यासाठी जिल्हा परिषदेत चकरा मारत होते. 5 जानेवारी रोजी त्यांनी शिक्षण अधिकार्‍यांच्या कार्यालयात जाऊन पदोन्नतीसंदर्भात संचिका तात्काळ का प्रस्तावित करत नाहीत?  या व अन्य कारणावरून त्यांनी शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांशी हुज्जत घातली होती. सदर कामासाठी आमटे शिक्षणाधिकार्‍यांशी शुक्रवारी सकाळी भेटले होते, ते पुन्हा दुपारनंतर शिक्षण विभागात आले.काही अधिकारी व कर्मचारी यांच्याशी आरडाओरड करून माझे काम लवकर का होत नाही. मी इमारतीवरून उडी मारिन’ असे म्हणत हुज्जत घातली. आमटे हे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक आहेत. त्यांनी केलेल्या या गैरवर्तनाची दखल सीईओ पाठक यांनी गंभीरपणे घेतली. सोमवारी पाठक यांनी आमटे यांच्यावर गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत त्यांचे निलंबन केले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.