बीड | वार्ताहर
चाळीस वर्षांपासून एकनिष्ठेने शिवसेनेची धुरा खांद्यावर घेऊन काम करणारे बीडचे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी उबाठा गटाला जय महाराष्ट्र केला आहे. आज शुक्रवारी पत्रकार परिषद घेत त्यांनी ही माहिती दिली.9 जानेवारी रोजी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहोत असे त्यांनी जाहीर केले.तसेच आता माझे वय 53 आहे त्यामुळे आणखी 5 वर्ष थांबणे म्हणजे खूप वेळ लागेल त्यामुळे येणारी विधानसभा निवडणुक मी लढणार आहे,पण अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घेतील असेही अनिल जगताप यांनी स्पष्ट केले.
बीड जिल्ह्यात विद्यार्थी दशेपासून शिवसेनेचे काम करत असलेले अनिल जगताप यांच्यावर 13 वर्ष जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी होती.मात्र अचानक त्यांच्याकडील जबाबदारी इतरांवर देण्यात आली.परंतु पुन्हा त्यांना ही संधी पक्षाने दिली. बीड जिल्ह्यात वाडी वस्ती तांड्यावर शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख यांचे विचार पोहचवण्याचे काम जगताप यांनी केले.मात्र काही दिवसांपूर्वी उबाठा गटाने जगताप यांना सहसंपर्क प्रमुख पदाची जबाबदारी देत नव्या पदाधिकाऱ्यांची निवड केली.तेव्हापासून जगताप नाराज होते.त्यांनी आज शुक्रवारी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली.ते म्हणाले की, 2009 ला उमेदवारी जाहीर झाली पण रात्रीतून काय झालं माहीत नाही. माझी उमेदवारी कापण्यात आली.सातत्याने अन्याय करण्यात आला. रात्रंदिवस काम करत असताना अचानक पद काढण्यात आल.त्यावेळी हसावं की रडावं असा प्रश्न पडला.
पद गेल्यावर अनेकांना फोन केले पण कोणीच उत्तर दिलं नाही.येणाऱ्या विधानसभा निवडणूकीसाठी मी कामाला लागलो असताना माझ्यावर अन्याय केला. शिवसेनेत अंधार सेनेचे वर्चस्व वाढले आहे.गाठूड्याचे व्यवहार झाले.अनेकदा अन्याय सहन करून शिवसेना वाढवण्यासाठी मी काम करत राहिलो 3 मतदार संघ, नंतर संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी माझ्यावे दडण्यात आली मात्र आता विधानसभा निवडणूक जवळ आली की माझे पद पक्षाने काढले त्याचे कारण मी शोधण्याचा प्रयत्न केला मात्र अजूनही यायचे उत्तर मला मिळाले नाही
ही तिसरी वेळ आहे मी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तयारीनिशी उतरणार होतो, त्यापूर्वी अशी घटना घडल्याने मी नाराज झालो. पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी यात लक्ष घातले पाहिजे होते.मात्र तसे काही झाले नाही त्यामुळे अंधारी सेनेला माझा जय महाराष्ट्र असे म्हणत येत्या 9 तारखेला रात्री 8 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार असून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊनच आम्ही पुढे वाटचाल करणार असल्याचे अनिल जगताप यांनी सांगितले.
Leave a comment