बीड सायबरची राजस्थानच्या जित्रेदी गावात मोठी कारवाई

बीड | वार्ताहर

 

सीएनजी गॅस पंप मंजूर करून देतो असे आमिष दाखवून बीडमधील एका नागरिकाला वेगवेगळे शुल्क भरायला सांगत तिघांनी त्या नागरिका कडून तब्बल 34 लाख रुपये ऑनलाईन हस्तगत करत फसवणूक केली होती. 26 ऑक्टोबर रोजी बीडमध्ये घडलेल्या या घटने प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर टीममधील अधिकारी कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत बारकाईने तपास हाती घेत याप्रकरणी दोघांना गजाआड करण्यात यश मिळवले. महत्त्वाचे हे की, हे दोन्ही आरोपी भाऊ असून ते राजस्थानातील गुन्हेगारांचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या जित्रेदी नामक गावात वास्तव्यास होते. त्या ठिकाणी पोलिसांना कारवाईसाठी जाणे म्हणजे रिस्क असते; मात्र बीड सायबर टीममधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने मोठ्या शिताफीने धाडसी कारवाई करत त्यांना साखरझोपेत असताना ताब्यात घेत बीडमध्ये आणले. सायबर टीमच्या या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत आहे.

 

सायबर पोलिसांच्या माहितीनुसार, जहिद (वय ३३), जुन्नर (४०) व हनिफ असद्दिन खान (४४, सर्व रा. जित्रेदी, जि. डिग, राजस्थान) अशी आरोपींची नावे असून, जहिद व जुन्नर यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत रंगनाथ सोपानराव काळकुटे (५३ रा. सावतानगर पूर्व, बीड) यांनी तक्रार दाखल केली होती. बीड शहरातील राम शेळके या गुत्तेदाराशी त्यांची ओळख होती. शेळके याने संदीप शर्मा माझा मित्र असून, मांजरसुबा भागात सीएनजी गॅस पंप टाकण्यासाठी मदत करेल म्हणून फेब्रुवारी २०२२ ते जानेवारी २०२३ या काळात काळकुटे यांच्याकडून तब्बल ३४ लाख २५ हजार ५०० रुपये रोख व ऑनलाईन घेतले. परंतु, आणखी पैशांची मागणी होऊ लागल्याने काळकुटे यांनी पैसे परत मागितले. यावर त्यांनी ते देण्यास टाळाटाळ केली, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर काळकुटे यांनी २६ ऑक्टोबर २०२३ रोजी सायबर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून संदीप, शेळके आणि हनिफ खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. पुरावे मिळताच उपनिरीक्षक निशिगंधा खुळे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक राजस्थानमध्ये पोहचले. स्थानिक पोलिसांची मदत घेऊन त्यांनी जहिद व जुन्नर या दोन भावांना अटक केली तर त्यांचा तिसरा मोठा भाऊ हनिफ हा फरार आहे. दोघांना अटक करताच तेथील काहीजणांनी पोलीस कारवाईदरम्यान गोंधळ सुरू केला. काहींनी छतावर जाऊन पोलिसांवर दगडफेक केली. मात्र याही स्थितीत कारवाई पूर्ण करून सायबर पथकाने मोठ्या शिताफीने आरोपींना गावाबाहेर आणले. ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि संतोष साबळे, सपोनि भारत काळे, उपनिरीक्षक शैलेष जोगदंड, निशिगंधा खुळे, आशिष वडमारे, श्रीकांत बारगजे, अनिल डोंगरे, सुनीता शिंदे, आदींनी केली

सायबर पोलिसांच्या धाडसी कारवाईचे होतेय स्वागत

 

राजस्थानातील जित्रेदी हे गाव पोलिसांवर हल्ला करणारे आणि गुन्हेगारी स्वरूपाचे असल्याचे सांगितले जाते त्यामुळेच या गावातून आरोपी आणणे जिकिरीचे असताना उपनिरीक्षक निशिगंधा खुळे यांनी आपले कौशल्य सिध्द करत पथकातील कर्मचारी आशिष वडमारे, श्रीकांत बारगजे, अनिल डोंगरे, सुनीता शिंदे यांच्या मदतीने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. या मोठ्या कारवाईसाठी बीड सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास करून राजस्थान गाठले होते. तेथे तीन दिवस पायी फिरून आरोपींची माहिती घेतली, संधी साधून दोन भावांना अटक केली तर सायबर पोलिसांची दूसरी टीम यांना बीडमधून सर्व माहिती देत होती.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.