बीड-प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा या शाळेवर कार्यरत असलेल्या सुनिता श्रीमंतराव जायभाये सहशिक्षिका यांना मैत्रा फाउंडेशनचा शिक्षण महर्षी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर साळेगावकर, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवासिनी देशमुख, सामाजिक कार्यकर्ते गौतम खटोड, स्नेहलताताई पाठक यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन सभागृहात रविवारी पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
मैत्र फाउंडेशनच्या वतीने कला साहित्य शैक्षणिक आणि सामाजिक सेवा कार्यात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय शिक्षण महर्षी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. मैत्री फाउंडेशन यांच्या संकल्पनेतून या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असून राज्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या प्रतिभावंत व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम केल्यामुळे सन 2023 चा शिक्षण महर्षी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने श्रीमती सुनिता श्रीमंतराव जायभाये यांना सन्मानित करण्यात आले.
Leave a comment