देव नवलेच्या अष्टपैलू कामगिरीने एकतर्फी विजय
बीड । वार्ताहर
बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित बीड प्रीमियर लीगच्या फायनलमध्ये बीएव्हीपी या संघाचा सात गडी राखून पराभव करीत देव नवलेच्या नेतृत्वाखालील नवले वारीयर्स या संघाने सहावी बीड प्रीमियर लीग जिंकली,चार बळी आणि नाबाद अर्धंशतक झळकावणार्या देव सुरेश नवले याने मॅन ऑफ दि मॅच चे बक्षिस पटकावतानाच दोन लाख रुपये आणि आकर्षक चषक जिंकला. गेल्या महिनाभर चालू असलेल्या या लीगचा समारोप आज हजारो क्रिकेट रसिकांच्या उपस्थितीत झाला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण,माजी मंत्री सुरेश नवले,क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर, अॅड.चंद्रकांतआप्पा नवले, समीर काझी,शुभम धुत ,सचिव प्रा.डॉ.अमेर सलीम यांच्या हस्ते विजेत्या आणि उपविजेत्या संघाला रोख बक्षीस आणि आकर्षक ट्रॉफी देण्यात आली. याशिवाय सर्वोत्कृष्ट खेळाडूंना रोख बक्षिसे देण्यात आली.प्रथम फलंदाजी करणार्या बीएव्हीपी लॉयन्स संघाला 20 षटकात अवघ्या 113 धावात रोखून नवले वारीयर्सने हा सामना 17.4 षटकात अवघे तीन गडी गमावून जिंकला, देव नवलेच्या लेगस्पिन गोलंदाजी समोर हा संघ चांगली स्थिती असताना 8 बाद 113 धावांवर ढेपळला, देवने अवघ्या 9 धावा देऊन चार गडी बाद केले तर जय गायकवाड या दुसर्या लेगस्पिनरने 22 धावा देत दोघांना तंबूचा रस्ता दाखवला.114 धावांचे विजयी लक्ष्य गाठताना देव नवलेने 34 चेंडूत 50 धावा काढतांना 5 चौकार आणि एक षटकार लगावला,तर त्याला चांगली साथ देत नाबाद 33 धावा काढणार्या जय गायकवाड याने 28 चेंडूत 3 चौकार आणि एक विजयी षटकार मारला,ऋषी सोनवणे याने संघाला उत्तम सुरुवात करून देताना 18 चेंडूत 21 धावा काढून विजयाचा पाया रचला.ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकारी सचिव अमेर सलीम, राजन साळवी,महेश वाघमारे, इरफान कुरेशी,जावेद पाशा,मनोज जोगदंड,शाहरूख खान,सुफियांन शेख,अमर विद्यागर आदींनी मोठे परिश्रम घेतले.
यांचा केला विशेष सन्मान
स्पर्धेच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव आमेर सलिम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पंच अथर मोमीन, भारत चव्हाण यांचा सन्मान केला. त्यानंतर उत्कृष्ट कोमेंट्रीबद्दल नासेर बागवान, सरफराज मोमीन, उत्कृष्ट किपर ओमकार काळे, उत्कृष्ट फिल्डर स्वप्नील साने, सूरज लवांडे, गोलंदाज जय गायकवाड, फलंदाज आदर्श शुक्ला, मन ऑफ द सिरीज ऋषिकेश सोनवणे, मन ऑफ द मॅच देव नवले याने स्वतः ऐवजी मॅन ऑफ द मॅच समर्थ कदमला दिला.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी यांचे योगदान महत्वाचे
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशचे कार्याध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर, सचिव आमेर सलीम, महेश वाघमारे, राजन साळवी, इरफान कुरेशी, मनोज जोगदंड, शुभम धूत, जावेद पाशा, रिजवान खान, आमेर सिद्दीकी, अमर विद्यागर, हामेद चाऊस, गोपाळ गुरखुदे, सुनील गोपीशेट्टी, सरफराज मोमीन, अतिक कुरेशी, अक्षय नरवडे, पठाण शाहरुख, सुफियान खान यांच्यासह अनेकांनी योगदान दिले.
Leave a comment