बीड / प्रतिनिधी
बीड जिल्ह्याचे भुमिपुत्र लोकनेते माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभरात भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून मंगळवार दि.07 डिसेंबर रोजी बीड मतदार संघातील 30 ठिकाणी रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे. या शिबीरामध्ये कार्यकर्ते, विद्यार्थी, पालक आणि जनतेने रक्तदानासारखे मोलाचे दान करून सहकार्य करावे असे आवाहन बाबूशेठ लोढा, नितीन लोढा, सखाराम मस्के, मनोज पाठक, माजी नगरसेवक विष्णू वाघमारे, राजेंद्र काळे, शिवाजीराव जाधव, अॅड.विष्णूपंत काळे, सचिन घोडके, महारूद्र वाघ, गोविंद जाधव, अर्जुन बहीरवाळ, दिलीप आहेर, धनंजय जगताप, विष्णू जाधव, भाऊसाहेब जानवळे, अर्जुन नरवडे, अशोक सोळूंके, अनिल निर्मळ, राजू पटेल, हनुमान जगताप, हनुमान आगाम, सुरेश काशिद, कांतराव सुरवसे, गोरख धन्ने, कृष्णा पितळे, कैलास येडे, अॅड.शेख खाजा, राजेंद्र बनसोडे, अमृत सारडा, जयदत्त थोटे, श्रीकांत माने, कपिल सोनवणे, मनोज मस्के, कैलास लगड, नवनाथ कुलकर्णी, सखाराम आखाडे, आंबादास गुजर, महेश सिंगन, दत्ता गायकवाड, प्रविण सुरवसे, अशोक आमटे, कल्याण खांडे, अंकुश चव्हाण, देवीलाल चरखा आणि काकू-नाना प्रतिष्ठाणच्या वतीने करण्यात आले आहे.
खालील ठिकाणी रक्तदात्यांसाठी रक्तदानाची व्यवस्था करण्यात आली असून यासाठी ठिकठिकाणचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. आपल्या लाडक्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त होणारे हे भव्य रक्तदान अनेक गरजू रूग्णांना जीवदान देणारे ठरणार आहे. यासाठी रक्तदात्यांनी खालील ठिकाणी रक्तदान करून सहभाग नोंदवावा.
विनायक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पेठ बीड,
गीता कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बीड
गजानन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजुरी (न.) ता.बीड
कृषी पंडीत भागुजीराव ढेकळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पाडळसिंगी, ता.गेवराई, जि.बीड
पाडळी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पाडळी, ता.शिरूर (का.) जि.बीड,
कालिकादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शिरूर (का.), जि.बीड,
साक्षाळपिंप्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, साक्षाळपिंप्री, ता.बीड
नागनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मोरगाव, ता.बीड
रामकृष्ण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बोरगाव, ता.केज,
यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कुर्ला, ता.बीड
शिवणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शिवणी, ता.बीड
आर्वी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, आर्वी ता.शिरूर (का.) जि.बीड
वडगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वडगाव(गुंधा), ता.बीड
पाटोदा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पाटोदा (बे.) ता.जि.बीड
नंदीग्राम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नांदूरघाट, ता.केज
पिंपळवाडी विद्यालय, पिंपळवाडी, ता.जि.बीड
लोणी विद्यालय, लोणी, ता.शिरूर(का.)
अंजनवती विद्यालय, अंजनवती, ता.जि.बीड
बोरखेड विद्यालय, बोरखेड
संत एकनाथ विद्यालय, पालसिंगन, ता.जि.बीड
कोरड्याचीवाडी विद्यालय, कोरड्याचीवाडी, ता.केज. जि.बीड
जगदंबा विद्यालय, राक्षसभुवन(तांबा), ता.शिरूर(का.) जि.बीड
माध्यमिक आश्रम शाळा, पोखरी, ता.बीड
औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय, म्हसोबा फाटा
सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक वैद्यकिय महाविद्यालय, बीड
कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पिंपळनेर तसेच रायमोहा, चौसाळा आणि येळंबघाट या ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
Leave a comment