बीड । वार्ताहर
जिल्हा परिषदेचे सीईओ अविनाश पाठक यांनी शिक्षण विभागाात कार्यरत असताना कर्तव्यात कामचुकारपणा करणार्या दोन अधिकार्यांसह एका कर्मचार्यावर शुक्रवारी (दि 1) निलंबनाची कारवाई केली. शासकीय कामांत जाणिवपूर्वक दफ्तरदिरंगाई तसेच न्यायालयीन प्रकरणांकडेही साफ दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे.
निलंबनाची कारवाई झालेल्यांमध्ये जी. पी. बिजलवाड (सहाय्यक प्रशासन अधिकारी), एम. जी. नायगांवकर (कनिष्ठ प्रशासन अधिकारी) व एस. सी. आखाडे (वरिष्ठ सहाय्यक) या प्राथमिक शिक्षण विभागातील तिघांचा समावेश आहे.
जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे न्यायालयीन प्रकरणे विविध न्यायालयांत दाखल आहेत. त्याप्रकरणांच्या वेळोवेळी न्यायालयात सुनावण्या ठेवून जिल्हा परिषदेला आदेश-निर्णय दिले जातात. काही प्रकरणात न्यालयालयाचे आदेशामध्ये वेळेची कालमर्यादा देवून जिल्हा परिषदेने तात्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश दिले जातात. अशा आदेशावर त्वरीत निर्णय घेणे आवश्यक असते. अन्यथा सदर प्रकरणात न्यायालयात अवमान याचिका दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे निलंबनाच्या पत्रात नमूद करण्यात आले. त्यामूळे आपल्या विभागाकडील न्यायालय प्रकरणाची माहिती मागविण्यात आली होती. तसेच ज्या प्रकरणात मुख्य कार्यकारी अधिकारी हे प्रतिवादी असून त्याप्रकरणात न्यायालयाने आदेश दिलेले असून अशा आदेशाला कालमर्यादा तरी अशा सर्व प्रकरणांची माहिती तीन दिवसांच्या आत सामान्य प्रशासन विभागाकडे जमा करणे बाबत आदेशित करुनही या तिघांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांनी या तिघांवर शुक्रवारी निलंबनाची कारवाई केली.
Leave a comment