बीड । वार्ताहर
राज्य शासनाने भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकार्यांना नव्या ठिकाणी नियुक्त्या दिल्या आहेत. यामध्ये बीड येथे 2021 च्या बॅचमधील आयएएस अधिकारी श्रीमती करिश्मा नायर यांची सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून बीड उपविभागात नियुक्ती दिली आहे.
राज्य शासनाने भारतीय प्रशासकीय सेेवा परीक्षा उर्त्तीर्ण झाल्यानंतर सर्व प्रशिक्षण पुर्ण केलेल्या 9 अधिकार्यांना विविध ठिकाणी नियुक्ती दिली आहे. यामध्ये यापूर्वी बीडमध्ये काम केलेले सहायक जिल्हाधिकारी आदित्य जीवने यांना आयटीडीपीचे प्रकल्प अधिकारी व भामरागड-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, अटापल्ली उपविभाग, गडचिरोली या पदावर नियुक्त करण्यात आले आहे. तर श्रीमती करिश्मा नायर यांना सहाय्यक जिल्हाधिकारी, बीड उपविभागात नियुक्त करण्यात आले आहे.
Leave a comment